२०२६ चाभारतीय अर्थसंकल्प म्हणजे सामान्य माणसाची कुचेष्टा …!:- किशोर चोरगे संस्थापक अध्यक्ष जयहिंद विचार मंच कोपरगाव
२०२६ चा भारतीय अर्थसंकल्प म्हणजे सामान्य माणसाची कुचेष्टा …!:- किशोर चोरगे संस्थापक अध्यक्ष जयहिंद विचार मंच कोपरगाव
आताच काही दिवसांपूर्वी देशाचा अर्थसंकल्प सादर केला गेला या अर्थसंकल्पात सामान्य माणसाची कुचेष्टा करण्याची सरकारने कोणतीच कसर सोडली नाही सामान्य माणसाला काल हि काहिच मिळाले नव्हते आज हि सामान्य माणसाला काहीच मिळाले नाही या अर्थसंकल्पात सामान्य माणुस दुर्लक्षित राहिलेल्या अवस्थेत दिसला जो सामान्य माणुस साधा रेल्वेने बसने भाडेवाढ झाली आहे म्हणुन प्रवास करायला घाबरतो तो विमानाचे तिकीट कमी झाल्याने त्यांच्या जिवनावर काय फरक पडणार आहे सामान्य माणसाला लागणाऱ्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या पाहिजे आज भारताची शासकिय आरोग्य व्यवस्थेत साधे गर्भवती महिलांची डिजीटल सोनोग्राफी होत नाही एमा रा आय होत नाही अगदी विलाजा करता दहा रूपये शेकड्याने खाजगी सावकाराकडून कर्ज काढुन विलाज करावा लागतो शिक्षणा साठी कर्ज घ्यावे उद्या बसने रेल्वेने प्रवास करतांना हि कर्ज घ्यावे लागले नाही म्हणजे कमवले
गॅस पेट्रोल डिझेल वाहतूक अनेक बाबी आहे ज्या रोजच्या जिवनात उपयोगी पडणाऱ्या आहे त्या महाग आहे त्यामुळे आज हि सामान्य माणुस प्रत्येक बाबतीत टॅक्स देतो त्याचा विचारच अर्थसंकल्पात होत नाही
एका केंद्रीय मंत्र्याने इथेनॉल चा वापर झाला तर पेट्रोल १५ रू लिटर होईल असे भाष्य केले होते ते शंभरी पार गेले देशाचा अर्थसंकल्प हा सामान्य माणसाला न्याय देणारा नसुन सामन्य माणसाचे खिसे पाडणारा आहे
तसेच देश असो वा राज्य किंवा महानगरपालिका व नगरपालिका यांचे हि अर्थसंकल्प हे सामान्य माणसाला न्याय देणारे राहत नाही

रेशन दुकानात ७० हजारांची गाडी घेऊन रेशन आणणारा सामान्य माणूस दिसतो पण जनतेच्या करातुन लोकप्रतिनिधींना भरमसाठ पगार देऊन हि विधान सभा लोकसभेतील तुटपुंज्या किंमतीवर सुविधा मिळवणारा लोकप्रतिनिधी दिसत नाही
आज सामान्य माणसाच्या खिशात काही शिल्लक ठेवणारा अर्थसंकल्प सादर होण्याची आशा हि कधीच मावळली आहे भरकटतो मरतो तो सामान्य कारण दिवसरात्र कष्ट डोरागत मेहनत करून परत दहाव्या मयताला सुध्दा कर्ज काढुन विधी करावा लागता हा अत्याचार प्रशासन शासनाने लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर करून थांबवला पाहिजे आपला देश काहीच दिवसाने शतकापार वाटचाल करेन पण लोकशाहीत सामान्य नागरीकांना न्याय मिळेल कि नाही हे प्रश्न चिन्ह आहे ते कधी जिवनातुन हद्दपार केले जाणार आहे का नाही
म्हणुन वाटत आताचा अर्थसंकल्प हा सामन्य माणसाच्या तोंडाला खरकटे पान पुसणारा आहे आपण सामान्य माणसाने किंबहुना सामान्य माणसाला या अर्थसंकल्पात काहीच मिळाले नाही हि शोकांतिका आहे



