महाराष्ट्र

एम.आय.डी.सी. प्रवेशद्वार सोनवेवाडीमध्येही व्हावे – स्नेहलताताई कोल्हे

एम.आय.डी.सी. प्रवेशद्वार सोनवेवाडीमध्येही व्हावे – स्नेहलताताई कोल्हे
स्थानिक उद्योग व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील शिर्डी-सावळीविहार एम.आय.डी.सी.च्या प्रवेशद्वाराबाबत महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. सध्या सदर एम.आय.डी.सी.चे प्रवेशद्वार सावळीविहार येथे नियोजित असून, त्याच प्रमाणे उत्तर बाजूस सोनेवाडी येथे देखील प्रवेशद्वार व्हावे, अशी ठाम मागणी भाजपा नेत्या मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सौ. कोल्हे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, सद्यस्थितीत असलेले प्रवेशद्वार हे मुख्यत्वे एकाच बाजूस असल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा फटका स्थानिक नागरिकांसह उद्योग व्यवसायांनाही बसू शकतो. तसेच आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांना वेळेत पोहोचणे अडचणीचे ठरू शकते.सोनेवाडी परिसरात एम.आय.डी.सी.साठी आवश्यक भू-संपादन पूर्ण झाले असून, उत्तर बाजूस स्वतंत्र प्रवेशद्वार उपलब्ध केल्यास वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल. यामुळे कामगारांचा वेळ वाचेल, उद्योगांना गती मिळेल आणि औद्योगिक उत्पादन क्षमतेत वाढ होईल. परिणामी संपूर्ण कोपरगाव तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, आणि कोपरगावच्या युवकांना रोजगारासाठी हा मार्ग सुलभ ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन नियोजित शिर्डी-सावळीविहार एम.आय.डी.सी.साठी प्रवेशद्वार सोनेवाडी येथे उत्तर बाजूस देण्यात यावे, अशी विनंती कोल्हे यांनी केली आहे. हा निर्णय झाल्यास स्थानिक नागरिक, कामगार, उद्योगजगत तसेच आपत्कालीन सेवा यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे