लिंक्डइनचा प्रभावी वापर आणि प्रभावी रिझ्युम : यशाची दोन सूत्रे

लिंक्डइनचा प्रभावी वापर आणि प्रभावी रिझ्युम : यशाची दोन सूत्रे
प्रोफेशनल नेटवर्किंग आणि रिझ्युम रायटिंगवर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील संगणक विज्ञान, प्लेसमेंट व करिअर काउन्सेलिंग सेल, स्किल डेव्हलपमेंट कोर्स कमिटी ,आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेल व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी “LinkedIn Handling आणि Resume Building” या विषयावर एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. श्री. महेंद्रशेठ काले यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा. प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक बंगलोर येथील एटीएस ऑटोमेशनचे सीनियर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी इंजिनिअर मा. श्री. राहुल नाईकवाडे यांनी, “प्रभावी लिंक्डइन प्रोफाइल तयार करणे, प्रोफेशनल नेटवर्किंगचे महत्त्व तसेच करिअर संधी मिळवण्यासाठी लिंक्डइनचा योग्य वापर” याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

पुणे येथील एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या तांत्रिक प्रमुख मा. सौ. आरती नाईकवाडे यांनी रिझ्युम बिल्डिंग या विषयावर मार्गदर्शन करताना, “प्रभावी रिझ्युम तयार करण्याच्या पद्धती, इंडस्ट्रीच्या अपेक्षा आणि मुलाखतीसाठी आवश्यक मुद्दे” यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता, करिअरसाठी आवश्यक असलेली डिजिटल कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन करत लिंक्डइनसारख्या व्यावसायिक प्लॅटफॉर्मचा योग्य वापर आणि प्रभावी रिझ्युम तयार करणे ही आजच्या स्पर्धात्मक युगातील गरज असल्याचे नमूद केले.”या कार्यशाळेचा उद्देश, पाहुण्यांचे स्वागत व परिचय संगणकविज्ञान विभाग प्रमुख प्रा. सौ. प्रतीक्षा रोहम यांनी करून दिला. या कार्यशाळेसाठी स्किल डेव्हलपमेंट कोर्स कमिटीचे प्रमुख प्रा. तानसेन रणदिवे, प्लेसमेंट व करिअर काउन्सेलिंग सेलचे समन्वयक प्रा. दिलीप भोये आणि संगणकविज्ञान विभागातील विद्यार्थी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. कु. जिज्ञासा बनकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. ऋषिकेश सोनवणे यांनी मानले.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk
कोपरगावात वास्तव राहिलेल्या शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे सुमित डेंगळे यांचे व्याख्यान
https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I



