इनडोअर गेम हाॅल उत्तरेकडील जागेत जेष्ठ नागरिक उद्यान करून त्यास जेष्ठ नागरिक वसंतदादा चोरगे नाव द्यावे:-. दिलीप घुमरे

इनडोअर गेम हाॅल उत्तरेकडील जागेत जेष्ठ नागरिक उद्यान करून त्यास जेष्ठ नागरिक वसंतदादा चोरगे नाव द्यावे:-. दिलीप घुमरे
कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी नगराध्यक्ष इनडोअर गेम हॉल शेजारील जागेत जेष्ठ नागरिक विरंगुळा उद्यान विकसित करून त्यास “जेष्ठ नागरिक कै. वसंतदादा चोरगे उद्यान” असे नामकरण करणे बाबत दिलीप गणपत घुमरे पा उपाध्यक्ष जयहिंद विचार मंच कोपरगाव यांनी निवेदन दिले असुन निवेदनात पुढे म्हंटले आहे कि आमच्या शहरातील इनडोअर गेम हॉल उत्तरेकडील भाग शेजारील मोकळी जागा सध्या रिकामी असून त्या जागेचा योग्य वापर होत नाही. तसेच सदर जागेत काही नागरिकांकडून कचरा फेकला जात असल्याने परिसर अस्वच्छ होत आहे व आरोग्याच्या दृष्टीने समस्या निर्माण होत आहे.त्या जागेचा उपयोग जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा उद्यान म्हणून करण्यात यावा अशी सामाजिक संस्था व नागरिकांची मागणी आहे .सदर ठिकाणी जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाके, चालण्याचा ट्रॅक,हिरवळ, झाडे, प्रकाश व्यवस्था इ. सुविधा उपलब्ध झाल्यास परिसरातील नागरिकांना विशेष लाभ होईल.तसेच सदर उद्यानास सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, १९७५ सालचे शिंगणापूर येथील रहिवासी कै. वसंतदादा चोरगे यांच्या स्मरणार्थ नाव देण्यात यावे, अशी नागरिकांची भावना आहे.कै. वसंतदादा चोरगे यांनी समाजकार्यात मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त कै. वसंतदादा चोरगे स्मृती प्रतिष्ठान, कोपरगाव तर्फे अनेक उपक्रम कायमस्वरूपी राबवले जातात. म्हणून सदर उद्यानास“जेष्ठ नागरिक कै. वसंतदादा चोरगे विरंगुळा उद्यान” असे नामकरण करण्यात यावे, अशी विनंती आहे.तरी सदर प्रस्तावास येत्या सर्वसाधारण सभेत मान्यता देऊन इनडोअर गेम हॉल शेजारील जागेत जेष्ठ नागरिक विरंगुळा उद्यान विकसित करण्या बाबत तसेच उद्यानास “जेष्ठ नागरिक कै. वसंतदादा चोरगे उद्यान” असे नामकरण करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी निवेदना अंती जयहिंद विचार मंच चे उपाध्यक्ष दिलीप घुमरे यांनी विनंती. केली आहे



संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk
कोपरगावात वास्तव राहिलेल्या शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे सुमित डेंगळे यांचे व्याख्यान
https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I


