महाराष्ट्र

सहकारातील संजीवनी हरपली – छगन भुजबळ

शंकरराव कोल्हे कोल्हे यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांची वेशभूषा परिधान केली.त्यांनी मराठी मातीतील माणसासाठी लोककल्याणाची कामे केली. शेती क्षेत्रात त्यांनी संशोधनाला प्राधान्य दिले. शेतकऱ्यांना शेतीला दुधासोबत इतर पूरक व्यवसायाची जोड मिळवून दिली. राज्यातील राजकारणात त्यांना विशेष स्थान होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्यासोबत काम केलं. त्यांनी सहकार व शेती क्षेत्राविषयी सतत मार्गदर्शन केले. शरद पवार यांचे ते अतिशय विश्वासू सहकारी होते. त्यांच्या निधनाने सहकार महर्षी आणि सहकारातील संजीवनी हरपली अशा शब्दात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोल्हे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते.  याप्रसंगी सिंधुताई कोल्हे, नितीन कोल्हे, बिपीन कोल्हे, डॉ.मिलिंद कोल्हे, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, अमृता पवार आदी उपस्थित होते.
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी या लिंकचा वापर करा
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे