सामाजिक
वैभव लासुरे यांना मास्टर्स ऑफ फार्मसी मध्ये सुवर्णपदक
वैभव लासुरे यांना मास्टर्स ऑफ फार्मसी मध्ये सुवर्णपदक
संपादक:- रवींद्र जगताप
माहेगाव देशमुख येथील रहिवासी वैभव उत्तमराव लासुरे यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रीसर्च, लखनऊ, उत्तरप्रदेश येथे मास्टर्स ऑफ फार्मासि मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सुवर्ण पदक मिळवले. दि.२३ सप्टेंबर रोजी झालेल्या ८ व्या पदवीदान समारंभा मध्ये प्रोफेसर संजय सिंह, कुलपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, लखनऊ यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन पदवी प्रदान करण्यात आली. चि. वैभव याने अतिशय जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करून राष्ट्रीय पातळीवरील संस्थेत प्रवेश मिळवून हे यश प्राप्त केले. सदर यश प्राप्त केल्याबद्दल वैभव चे दाजी डॉ. विशाल नवनाथ गमे (मढी बु.) यांचेकडून तसेच पंचकृषितून अभिनंदन व कौतुक केले जातेय.


वन नेशन व इलेक्शन फायदे तोटे जाणून घ्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा
या कारणांमुळे मी राजकारणात प्रवेश केला पंकजाताई मुंडे सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा
सत्य एक्सप्रेस न्यजच्या व्हाँटसाप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा


