सामाजिक

आधुनिक भारताच्या जडणघडणीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मोलाचे योगदान – आ. आशुतोष काळे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना आ. आशुतोष काळे

आधुनिक भारताच्या जडणघडणीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मोलाचे योगदान – आ. आशुतोष काळे

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या राजकीयसामाजिकधार्मिकशैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करून प्रत्यक्षात ते बदल घडवून आाणले. त्यामुळे आज प्रगतिशील भारत देश प्रत्यक्ष स्वरूपात दिसत असून आधुनिक भारताच्या या जडणघडणीत महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी त्यांच्या अलौकिक बुद्धीच्या व ज्ञानाच्या जोरावर अनेक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांचे मोलाचे कार्य म्हणजे देशाच्या मध्यवर्ती ‘रिझर्व बँके’ ची स्थापना असून वीज निर्मिती आणि जलसिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी देशातील पहिला नदी-खोरे प्रकल्प तयार केला. जलनिती बरोबरच कामगार कल्याणाचे कायदेऔद्योगिकीकरण आणि त्यातून साधला जाऊ शकणारा देशाचा विकास यासाठी त्यानी अनेक योजना तयार केल्या. तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्व शक्तिनिशी जागा करून आत्मसन्मानस्वाभिमानअस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून देवून हक्काने जगण्याचे शिकवले. त्यासाठी संघर्षाचे सत्याग्रह करून समता व न्याय समाजात निर्माण केला असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी म्हटले आहे.यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचाराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पेशहराध्यक्ष सुनील गंगूलेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळेसामाजिक न्याय सेलचे तालुकाध्यक्ष सुनील मोकळशहराध्यक्ष प्रकाश दुशिंगमाजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावकेमंदार पहाडेसंदीप पगारेदिनकर खरेकृष्णा आढाव,राजेंद्र वाकचौरे,गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदारविद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदारडॉ. तुषार गलांडेचंद्रशेखर म्हस्केविजय त्रिभुवनशंकरराव घोडेरावबाळासाहेब रुईकरसंदीप कपिलेअॅड.मनोज कडूआकाश डागाइम्तियाज अत्तारराजेंद्र खैरनारडॉ. राजेंद्र रोकडेदिनेश पवारबाळासाहेब शिंदेशैलेश साबळेविकास बेंद्रेबापू वढणेमनोज नरोडेसचिन गवारेऋषिकेश खैरनार,योगेश वाणीशिवाजीराव कुऱ्हाडेभाऊसाहेब भाबडचांदभाई पठाणसंतोष शेजवळमुकुंद इंगळेविशाल राऊतमहेश उदावंतगणेश बोरुडेराकेश धाकतोडेमनोज शिंदेसंजय दुशिंगराजेंद्र आभाळेनितीन शिंदेराजेंद्र उशिरेशिवाजी लकारेकिरण बागुलराकेश शहाबाळासाहेब सोनटक्केनिलेश रुईकरबाबुराव पवारप्रविण शेलारशिवाजी कुऱ्हाडेजय बोरागिरीश हिवाळेकैलास साळवेसंदीप वाघराकेश धाकतोडेसुनील सातदिवेआकाश गायकवाडराणीताई बोर्डेसविताताई भोसले आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे