महाराष्ट्र

जय मातादी प्रतिष्ठानच्या वतिने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 जय मातादी प्रतिष्ठानच्या वतिने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कोपरगाव प्रतीनिधी:- कोपरगाव शहरातील टिळकनगर परिसरात जय मातादी प्रतिष्ठानच्या वतिने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विजय नागरे  यांच्या मागदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे.. दि १९ फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस श्री.साईबाबा संस्थांनचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी नामदार आशुतोष काळे, नगरसेवक मंदार पहाडे, सुनिल शिलेदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने  तमाम भारतीयांना शुभेच्छा देण्यात आल्या टिळकनगर भागात भगवे झेंडे पताक्या लावण्यात आल्या होत्या यामुळे टिळकनगर परिसर भगवेमय झाले होते.अंत्यत आनंदाने मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यास आली.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरूणांनी आत्मसात करुन आपल्या जीवनाची वाटचाल करावी.टिळकनगर परिसरातील महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे