ब्रेकिंग

सण उत्सवातून निर्माण झालेले ऐक्याचे वातावरण कायम जपले जावे – विवेकभैय्या कोल्हे

सण उत्सवातून निर्माण झालेले ऐक्याचे वातावरण कायम जपले जावे – विवेकभैय्या कोल्हे
कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी रमजान ईद निमित्त सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, मुस्लिम बांधव व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, रमजान ईद हा एकात्मतेचा आणि सद्भावनेचा संदेश देणारा सण आहे. महिनाभर उपवास करणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या श्रद्धेचा आणि समर्पणभावनेचा गौरव या निमित्ताने सर्वांनी साजरा केला. पवित्र रमजान महिन्याच्या शेवटी संपूर्ण समाजाने एकत्र येऊन प्रेम, बंधुत्व आणि सलोख्याचा संदेश देणे महत्त्वाचे आहे.
स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांपासून गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून ईद निमित्त इफ्तारचे आयोजन केले जात असून या वर्षी देखील विविध ठिकाणी इफ्तार पार्टी आणि मज्जितमध्ये फळांचे बॉक्स कोल्हे कुटुंबाकडून पाठविले गेले. या उपक्रमामुळे सर्व समाजात सलोखा वाढतो, धार्मिक ऐक्य वृद्धिंगत होते आणि परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते. कोल्हे परिवाराने नेहमीच तालुक्यात शांतता, बंधुत्व आणि विकास जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे.विवेकभैय्या कोल्हे यांनी पुढे सांगितले की, सण आणि उत्सव हे समाजाला एकत्र आणण्याचे माध्यम आहेत. त्यामुळे अशा प्रसंगी परस्पर सौहार्द वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कोल्हे परिवाराच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आणि येणारे दिवस आनंदाचे, सुखाचे व भरभराटीचे जावोत अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.या प्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,गटनेते, सर्व समिती सभापती,सर्व नगरसेवक,आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे