महाराष्ट्र

एडवोकेट अजित झोडगे यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान

एडवोकेट अजित झोडगे यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान

कोपरगाव, 8 मार्च 2026: एकलव्य आदिवासी परिषदेच्या पुढाकारातून एडवोकेट अजितजी बाळासाहेब झोडगे यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये नामदेव सोनवणे हत्याकांडातील पीडित कुटुंबाच्या बाजूने प्रामाणिकपणे व प्रखर बाजू मांडत आरोपीचे जामीन रद्द करत ऐतिहासिक निकाल लावल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात येत आहे.

रविवार, 8 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, कोपरगाव येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.आदिवासी बहुजन तसेच आंबेडकरवादी जनसमुदायाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे