अमेरिका-भारत शेतीमाल करार रद्द करा विजय जाधव

अमेरिका-भारत शेतीमाल करार रद्द करा विजय जाधव
अमेरिका-भारत शेतीमाल करार रद्द करण्याची मागणी; कोपरगाव बाजार समिती ऑडिटचीही मागणी
कोपरगाव (प्रतिनिधी):भारतीय शेतकऱ्यांच्या हिताच्या संरक्षणासाठी अमेरिका–भारत शेतीमाल आयात-निर्यात करार तात्काळ रद्द करावा तसेच कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन २०१५ ते २०२६ पर्यंतचे सर्व सरकारी ऑडिट शासनाच्या नियमांनुसार करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मुर्शतपुर (ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) येथील अर्जदार विजय सुधाकर जाधव यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांना सादर केलेल्या निवेदनात हा करार भारतीय शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारा असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेतून भारतात येणाऱ्या शेतीमालावर शून्य टक्के आयात कर असून भारतीय शेतीमालावर मोठ्या प्रमाणात कर आकारला जात असल्याने भारतीय शेतकऱ्यांवर आर्थिक अन्याय होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमेरिकेतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सरकारी सबसिडी मिळत असल्यामुळे त्यांचा कांदा, मका, सोयाबीन, कापूस, दूध आदी शेतीमाल भारतात स्वस्तात येऊन भारतीय बाजारपेठेला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे भारतीय मका, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत येतील तसेच दुग्ध व्यवसायावरही गंभीर परिणाम होऊ शकतो, असे निवेदनात म्हटले आहे.याशिवाय कांद्यास हमीभाव जाहीर करणे, सर्व शेतीमालाला कायदेशीर हमीभाव देणे, भारतीय शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी आयात नियंत्रणाचे कठोर धोरण लागू करणे आणि कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे २०१५ पासून आतापर्यंतचे सर्व ऑडिट शासन नियमांनुसार करणे या मागण्या देखील करण्यात आल्या आहेत.सरकारने या मागण्यांचा तातडीने विचार करावा, अन्यथा शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारू शकतात, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk
कोपरगावात वास्तव राहिलेल्या शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे सुमित डेंगळे यांचे व्याख्यान
https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I



