ब्रेकिंग

कोपरगाव नगरपरिषदेला ०१ कोटी निधी मंजूर – आ.आशुतोष काळे

कोपरगाव नगरपरिषदेला ०१ कोटी निधी मंजूर – आ.आशुतोष काळे

कोपरगाव :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियाना अंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेला शाळामहिला आरोग्य व इतर नागरी सुविधा पुरवण्यासाठी ०१ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामाजिकसांस्कृतिक व लोककल्याणाच्या क्षेत्रात दिलेले व्यापक योगदान विचारात घेऊन त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नागरी स्थानिक संस्थांमध्ये सर्वांगीण नागरी विकास साधण्यासाठी नागरी लोककल्याण अभियान राबविण्याचा महायुती शासनाचा मानस आहे. या अनुषंगाने नागरी स्थानिक संस्था क्षेत्रातील शाळांची विशेषतः मराठी शाळांची गुणवत्ता वृध्दीआरोग्याच्या विशेषतः महिला आरोग्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करणेपर्यावरण व नागरी स्वच्छतापर्यटन विकास तसेच नागरी स्थानिक संस्थांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन देणे या उद्देशाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविण्यात येणार असून सदर अभियानांतर्गत विकसित करण्यात आलेल्या नागरी सुविधांची विभाग स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

 त्यासाठी राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविण्यासाठी प्रत्येकी ०१ कोटी निधी देण्यात आला असून यामध्ये कोपरगाव नगरपरिषदेला देखील ०१ कोटी निधी देण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे कोपरगावकरांच्या वतीने आभार मानले आहे.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

कोपरगावात वास्तव राहिलेल्या  शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे  सुमित डेंगळे यांचे व्याख्यान

https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे