अरुण खरात यांना पद्मभूषण पत्रकार बाळासाहेब भारदे पुरस्कार जाहीर

अरुण खरात यांना पद्मभूषण पत्रकार बाळासाहेब भारदे पुरस्कार जाहीर
. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना पुणे येथील काव्यात्मा साहित्य परिषद यांचे वतीने राज्यस्तरीय पद्मभूषण बाळासाहेब भारदे पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अरुण खरात यांना काव्यात्मा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आत्माराम हारे यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे येत्या रविवारी पुण्यात हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी निमंत्रितांचे कवी संमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री प्रतिमा काळे या करणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध निवेदक श्रीकांत चौगुले, पुरुषोत्तम सदाफुले तर वृक्षमित्र अरुण पवार उपस्थित राहणार आहेत. राजकारण, समाजकारण, अध्यात्म, सहकार, पत्रकारिता अशा सर्व क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे बाळासाहेब भारदे यांच्या नावाने मला पुरस्कार मिळणे ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची व आनंदाची आहे अशी भावना अरुण खरात यांनी व्यक्त केली. अरुण खरात यांना पुरस्कार जाहीर होताच त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.



संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk
कोपरगावात वास्तव राहिलेल्या शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे सुमित डेंगळे यांचे व्याख्यान
https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I



