महाराष्ट्र

नाशिक महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंतापदी दानिश शेख यांची नियुक्ती

नाशिक महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंतापदी दानिश शेख यांची नियुक्ती

कोपरगाव वार्ताहर- हे गौतम पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी व सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले येथे कार्यरत असलेले दानिश शेख यांची नुकतीच नाशिक महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंतापदी नियुक्ती झाली असून कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आमदार आशुतोषकाळे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 अभियंता दानिश शेख हे गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख यांचे धाकटे चिरंजीव व सध्या मीरा-भाईंदर नवघर डिव्हिजन येथे एसीपी म्हणून कार्यरत असलेले सोहेल शेख यांचे ते धाकटे बंधू आहेत. दानिश शेख यांचे शिक्षण गौतम पब्लिक स्कूलमध्ये झाले असून अभियांत्रिकी शिक्षण येवला व संगमनेर येथे पूर्ण केले आहे. ते हॉकीचे उत्कृष्ट खेळाडू असून देश व राज्य पातळीवरील अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत.त्यांच्या नियुक्तीबद्दल संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे तसेच संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांनी गौतम परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी संस्थेचे इन्स्पेक्टर नारायण बारे, गौतम पॉलिटेक्निकचे प्राचार्य वासिम शेख उपस्थित होते.  

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

कोपरगावात वास्तव राहिलेल्या  शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे  सुमित डेंगळे यांचे व्याख्यान

https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे