कोकमठाण येथे राज्यस्तरीय औषधनिर्मिती विषयक सेमिनारचे आयोजन
कोपरगाव : राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनच्या आर.जे.एस. कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे “From Molecule to Medicine: Drug Discovery, Design & Formulation” या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेमिनार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात होणार आहे.

या सेमिनारचा मुख्य उद्देश औषध निर्मिती क्षेत्रातील नव्या संशोधन प्रवाहांची माहिती देणे, तसेच विद्यार्थ्यांना, संशोधकांना व प्राध्यापकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी परिचित करणे हा आहे. विशेषतः Computer-Aided Drug Design (CADD), drug formulation, bioavailability enhancement, QSAR studies, molecular docking यांसारख्या अत्याधुनिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संतोष एस. छाजेड (MET’s Institute of Pharmacy, नाशिक) व डॉ. सचिन एस. गायकवाड (MET’s Institute of Pharmacy, नाशिक) उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. ते अनुक्रमे “Computer-Aided Drug Design (CADD): Tools and Applications in Drug Discovery” आणि “Drug Formulation Strategies: From Active Molecule to Effective Dosage Form” या विषयांवर सविस्तर व्याख्याने देणार आहेत.सेमिनारमध्ये नोंदणी, उद्घाटन, तज्ज्ञ व्याख्याने, प्रश्नोत्तर सत्र, तसेच प्रमाणपत्र वितरण अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमात प्राध्यापक, संशोधक (PG/PhD) तसेच B.Pharm आणि M.Pharm विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.नोंदणी शुल्क फक्त ₹२००/- ठेवण्यात आले असून इच्छुकांनी २२ एप्रिल २०२६ पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी QR कोडद्वारे किंवा ऑनलाइन लिंकद्वारे अर्ज करता येणार आहे. अधिक माहिती साठी +91 9604679000 ह्या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा.महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष चांगदेव कातकडे, सचिव प्रसाद कातकडे, सल्लागार दीपक कोटमे व विजय कडू,संचालक प्रणित कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. नितीन पी. जैन (प्राचार्य) असून सहसंयोजक डॉ.उषा जैन आणि समन्वयक कवडे डी. एम. हे आहेत.औषधनिर्मिती क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान मिळविण्याची ही उत्तम संधी असून, इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


