कुंभारी, नाटेगाव च्या पाणी पुरवठा योजनेचे ना. आशुतोष काळेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण कायमची थांबणार

कोपरगाव प्रतिनिधी :- मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कुंभारी व नाटेगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांना यश मिळून जलजीवन मिशन योजने अंतर्गत कुंभारी गावासाठी ९ कोटी २३ लाख व नाटेगावला १ कोटी १६ लाख रुपये निधी मिळाला आहे. या पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन नुकतेच ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.यावेळी बोलतांना ना. आशुतोष काळे म्हणाले की, मागील अडीच वर्षात विकासाचा अनुशेष भरून काढतांना मतदार संघातील अनेक गावातील रस्ते, वीज, पाणी अशा प्रश्नांबरोबरच अनेक वर्षापासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजना मार्गी लावल्या. रस्त्यांचा विकास झाल्यामुळे व पिण्याच्या पाण्याचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरिकांच्या बहुतांश अडचणी दूर झाल्या आहेत. परंतु विकास कामांबरोबरच शिक्षण देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फुलवितांना शाळा महाविद्यालयांचे जाळे विणले. त्यातील एक शाळा म्हणजे कुंभारी येथील गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालय आहे. या विद्यालयाच्या उभारणीत व विस्तारीकरनात काळे साहेबांचा मोठा वाटा आहे. ज्याप्रमाणे ध्यानमंदिर महत्वाचे आहेत त्याप्रमाणे ज्ञानमंदिर देखील अतिशय महत्त्वाची आहेत. आपल्याला कर्मवीर शंकरराव काळे साहेबांचा वारसा पुढे चालवून सुजान पिढी घडवायची आहे. त्यासाठी शाळांना आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. योगायोगाने रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाची जबाबदारी माझ्याकडे आहे मीदेखील मदत करण्यास तयार असून ग्रामस्थांनी देखील शाळेसाठी वर्गणी जमा करावी असे आवाहन नामदार आशुतोष काळे यांनी यावेळी केले. त्यावेळी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ह.भ.प.परमपूज्य महंत उंडे महाराज यांनी कुंभारीच्या गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयासाठी २१ हजार रुपयांची देणगी दिली. कुंभारी व नाटेगावच्या ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून मागील अनेक वर्षापासून महिलांची होणारी पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण कायमची थांबणार असल्यामुळे दोनही नागरिकांनी विशेषत: महिला भगिनींनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.यावेळी ह.भ.प.परमपूज्य महंत उंडे महाराज, माजी पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने, माजी पंचायत समिती सदस्य श्रावण आसने,बबनराव बढे, शिवाजीराव घुले, सरपंच प्रशांत घुले, उपसरपंच दिगंबर बढे, आण्णासाहेब बढे, रामराव साळुंके, वाल्मिक कबाडी, सतिश कदम, सुभाष बढे, रविंद्र चिने, अशोक वाघ, ललित निळकंठ, दिलीप ठाणगे, गिताराम ठाणगे, भाऊसाहेब कदम, दिनेश साळुंके, पैठणे सर, रमण गायकवाड, दिलीप कातोरे, वसंत घुले, आशिष थोरात, चांगदेव बढे, सोपानराव ठाणगे, यशवंत गायकवाड, परसराम बढे, बापूसाहेब वारुळे, बापू चव्हाण, भास्कर भारती, लक्ष्मण बढे, गणेश वाघ, निलेश कदम, सुदाम घुले, शिवाजी भारती, नानासाहेब शेजवळ, अभिजित चकोर, अतुल निळकंठ, राजेंद्र वारुळे, किशोर पवार, सुनील चंदनशिव, वाल्मिक निळकंठ, महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणचे उपकार्यकरी अभियंता विवेकजी रोटे, कनिष्ठ अभियंता प्रशांत कदम, ग्रामसेवक – काजवे, ठेकेदार व्ही.जे. समृत, जिनिंग प्रेसिंगचे उपाध्यक्ष गणेश गायकवाड, शिवाजी मोरे, गणेश मोरे, किरण कुदळे, विलास मोरे, जालिंदर उळेकर, प्रभाकर मोरे, तुकाराम मोरे, गोकुळ मोरे, जयवंत मोरे, रावसाहेब पिंगळे, डॉ. संपत मोरे, सनी मोरे, विश्वनाथ पोळ, भास्कर मोरे, नारायण मोरे, पुंडलिक मोरे, तान्हाजी मोरे, गोरख गरुड, अंबादास मोरे, आप्पासाहेब मोरे, वैभव मोरे, आप्पासाहेब घोरपडे, नवनाथ मोरे, रविंद्र पिंपरकर, रघुनाथ मोरे, शरद मोरे, प्रभाकर मोरे, सुभाष मोरे, संतोष मोरे, जालिंदर मोरे, पंचायत समिती अभियंता उत्तमराव पवार, शाखा अभियंता लाटे, वाघ, दिघे, सातपुते, डी.ओ. रानमाळ, ग्रामसेवक भीमराज बागुल, ठेकेदार पी.के. काळे आदी उपस्थित होते



