सामाजिक

कोळनदीवरील बंधारे पालखेडच्या पाण्याने भरले- बबनराव निकम

कोळनदीवरील बंधारे पालखेडच्या पाण्याने भरले- बबनराव निकम

कोपरगांव :- पूर्व भागातील आपेगांव, शिरसगांव, सावळगांव, उक्कडगांव, तिळवणी, कासली, पढेगांव आदि परिसरातील कोळनदीवरील बंधारे पालखेड डाव्या कालव्याच्या ओव्हरफलोच्या पाण्याने भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे भरले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी प्रतोद केशवराव भवर व पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव निकम यांनी दिली.ते म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी पुर्व भागावर सातत्यांने विशेष लक्ष केंद्रीत करून येथील प्रलंबित समस्या सोडविण्यांसाठी काळजी घेतली होती. त्यानंतर भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी २०१४ पासुन पुर्व भागातील प्रत्येक प्रश्न समजुन घेवुन त्यावर मार्ग काढला आहे.
चालु पावसाळी हंगामात पर्जन्यमान कमी असल्याने पूर्व भागातील आपेगांव, शिरसगाव, सावळगांव, उक्कडगांव, तिळवणी, पढेगांव, कासली आदि परिसरात कोळनदीवर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कारखान्यांच्या यंत्रणेने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी बंधारे, पाझर तलाव, शेततळी केली असुन पालखेड कालव्याच्या पाण्यांने हे सर्व बंधारे भरून मिळावे म्हणून भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभाग नाशिकचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे यांच्याकडे बैठक घेवुन मागणी केली होती. पालखेडचे कार्यकारी अभियंता व येवला उपविभाग कार्यालयातील उपअभियंता श्री. पाटील यांच्याकडे याकामी विशेष पाठपुरावा केला होता त्यामुळे कोळनदीवरील सर्व बंधारे पालखेड ओव्हरफलोच्या पाण्याने भरून मिळाल्याने या परिसरातील नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई काही प्रमाणात कमी होण्यांस मदत झाली आहे. याकामी सर्वश्री. साहेबराव रोहोम, अंबादास पाटोळे, अशोक निवृत्ती शिंदे, मनोज तुपे, अशोक भानुदास शिंदे, सुरेश शिंदे, किसनराव गव्हाळे, शिवाजी जाधव, अशोक गायकवाड, केशव गायकवाड, संतोष भागवत, हेमंत निकम, श्री. पटेल, भिमा संवत्सरकर, कैलास संवत्सरकर आदिंनी ग्रामपंचायत ठराव दिले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे