महाराष्ट्र

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या इंधन बचत आवाहनाला देशात सर्वप्रथम संजीवनीचा ई – प्रतिसाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या इंधन बचत आवाहनाला देशात सर्वप्रथम संजीवनीचा ई – प्रतिसाद
इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिक, उद्योग व संस्थांना ऑनलाइन बैठका घेऊन इंधन बचतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले असताना, त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत संजीवनी उद्योग समूहाने देशात आदर्शवत पाऊल उचलले आहे. आपल्या कामकाज बैठका ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय राबवणारा संजीवनी उद्योग समूह हा देशातील पहिला सहकारी उद्योग समूह ठरला आहे.या बैठकीत जागतिक पातळीवर युद्धजन्य स्थितीत कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे व देशात इंधन बचत केल्यास परकीय चलन वाचवता येईल या बाबीवर संजीवनी उद्योग समूहाने गांभीर्याने निर्णय घेतले आहे.
उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे तसेच कोल्हे कारखाना अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेत कारखाना ओरशियर आणि फिल्डमॅन यांच्यासाठी इलेक्ट्रिक बाईक आणि दैनंदिन वापराचे सर्व भाडोत्री वाहने ही सी एन जी व इलेक्ट्रिक असणारीच वापरावी असा निर्णय घेण्यात आला आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत इंधन बचत, वेळेची बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला आहे. ग्रामीण सहकार क्षेत्रातही डिजिटल परिवर्तन शक्य असून त्यातून राष्ट्रीय हित साधता येते, हे या निर्णयातून अधोरेखित झाले आहे.
तातडीनं या निर्णयाची अंमलबजावणी करत संजीवनी कार्यस्थळावर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वापरासाठी दाखल करण्यात आला आहे त्याची औपचारिक सुरुवात केली आहे.सहकार महर्षी कोल्हे कारखाना हा नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी देशभरात ओळखला जातो. देशातील पहिला सहकारी सीबीजी प्रकल्प उभारण्याचा मान या कारखान्याला मिळाला असून देशात सर्वाधिक इथेनॉल निर्मिती करणारा पहिला सहकारी कारखाना म्हणूनही त्याची विशेष ओळख आहे. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते या सीबीजी प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते.कोरोना संकटाच्या काळातही देशात सर्वप्रथम सॅनिटायझर निर्मिती सुरू करणारा सहकारी कारखाना म्हणून कोल्हे कारखान्याने सामाजिक जबाबदारी पार पाडली होती. आता पुन्हा एकदा ऑनलाइन बैठकींचा निर्णय घेत इंधन बचत आणि पर्यावरणपूरक कार्यपद्धतीचा नवा आदर्श निर्माण करण्यात संजीवनी उद्योग समूहाने पुढाकार घेतला आहे.दूरदृष्टी प्रणालीद्वारे संजीवनी उद्योग समूहाने घेतलेली ही बैठक चर्चेचा विषय ठरत असून इतर देखील उद्योग समूह आणि व्यावसायिकांनी या उपक्रमाचा आदर्श घेत इंधन बचत इकडे पाऊल टाकण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे. या बैठकीत अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, चेअरमन आ. विवेकभैय्या कोल्हे, व्हा. चेअरमन ज्ञानेश्वर परजणे, सर्व संचालक, अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. त्यानंतर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर कारखाना कार्यस्थळावर सुरू करण्यात आला त्यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, नगराध्यक्ष पराग संधान, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सेक्रेटरी टी.आर.कानवडे,प्रकाश डुंबरे,अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

कोपरगावात वास्तव राहिलेल्या  शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे  सुमित डेंगळे यांचे व्याख्यान

https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

संपादक रविंद्र जगताप सत्य एक्सप्रेस
संपादकीय लेख क्र १२ :-कोपरगावचे पत्रकार शंकर दुपारगुडे यांच्या रुपाने जिल्ह्याचे नाव जगभर झळकले,सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र ११ भारतातील वाढते औद्योगीकरण आणि वाढती लोकसंख्या  नागरिकांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post.html

संपादकीय लेख क्र. १० कोपरगावात थंडीचा वाढता जोर, तर निवडणुकीत उमेदवारांची धावपळ आणि कसरत ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र ९ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर परंतु इच्छुक उमेदवारामध्ये कभी खुशी कभी गम सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र  ८ मान्सून पूर्व पावसाने गृह उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/05/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र ७ कोपरगावचा बिहार बिड होवु नये यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_88.html

संपादकीय लेख क्र. ६ चैत्र व वैशाख महिण्याचे कोपरगावचे अध्यात्मिक महत्व संपुष्टात? सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र. ५ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवटची आणि महत्वाची कोपरगाव शहरा नजीक असलेल्या या चौफुलीची दुर्दशा कधी मिटणार सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/01/blog-post_8.html

संपादकीय लेख क्र. ४ सावळीविहिर ते कोपरगाव रोड जलद गतीने होणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/06/blog-post.html

संपादकीय लेख क्र.३ श्रीमंतांच्या बेवड्या मुलांवर आवर घालणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र.2. जागतिक ग्राहक दिन, जागरूक ग्राहक होणे काळाची गरज,  सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_15.html

संपादकीय लेख क्र.१  कोपरगाव ची महाशिवरात्र आनंदाची एक पर्वणी आणि कोपरगावच्या महाशिवरात्रीचे बदलते स्वरुप सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_9.html

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे