ब्रेकिंग

कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये २३ विद्यार्थ्यांची निवड

कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये २३ विद्यार्थ्यांची निवड

कोपरगाव (प्रतिनिधी) –रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे करिअर काउन्सेलिंग अँड प्लेसमेंट सेल व आय.क्यू.ए.सी. विभागाच्या वतीने, Lumivicta.com यांच्या सहकार्याने आयोजित कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये विविध पदांसाठी २३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी दिली.

    

 या ड्राइव्हमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर्स पदासाठी ०४ विद्यार्थ्यांची तर बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट्स पदासाठी १९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.  निवड झालेल्या २३ विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यासाठी महाविद्यालय सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करत असून, भविष्यातही अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.” तसेच त्यांनी नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या विद्यार्थ्यांच्या  उल्लेखनीय यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अॅड. संदीप वर्पे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, मा. सौ चैताली ताई काळे, मा. आमदार विवेक कोल्हे, मा. श्री सुनील गंगुले, मा. श्री बाळासाहेब आव्हाड,कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ,  विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.घनश्याम भगत, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. दिलीप भोये, कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी  तसेच सर्व  विभाग प्रमुख यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे