ब्रेकिंग

एस. एस. जी. एम. महाविद्यालयात संशोधनासाठी भरीव निधीची तरतूद

एस. एस. जी. एम. महाविद्यालयात संशोधनासाठी भरीव निधीची तरतूद

कोपरगाव, दि. २२ : एस. एस. जी. एम. महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड संदीप वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रयत शिक्षण संस्थेच्या संशोधन व विकास धोरणांतर्गत सीड मनी (बीज प्रकल्प) साठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांच्या विविध संशोधन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.  या निर्णयामुळे महाविद्यालया मध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांच्या संशोधनाधिष्ठित उपक्रमांना चालना मिळणार असून नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे.

संशोधन व विकास धोरणानुसार विविध कार्यशाळा, परिसंवाद, आविष्कार स्पर्धा, लघु व दीर्घ संशोधन प्रकल्प, आणि संशोधनविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व प्राध्यापकांना आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी व प्राध्यापकांच्या संशोधनपर प्रसिद्ध झालेले शोधनिबंध, पेटंट, पुस्तके ई. साठी प्रोत्साहन निधीस महाविद्यालय विकास समितीने मंजुरी दिली आहे.

या बैठकीस महाविद्यालय विकास समितीचे सचिव  प्राचार्य डॉ. माधव सरोदे, सदस्य मा. सुनीलजी गंगुले, मा. बाळासाहेब आव्हाड, मा. महेंद्रशेठ काले, डॉ. बंडेराव तन्हाळ, डॉ. माधव यशवंत, डॉ. देविदास रणधीर, डॉ. प्रतिभा रांधवणे, डॉ. निलेश मालपुरे तसेच कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे