देश-विदेश
कोपरगावात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी-आ.आशुतोष काळे
कोपरगावात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी-आ.आशुतोष काळे
कोपरगाव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्प वृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम तसेच कोपरगाव शहराच्या इतिहासात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.हा भव्य दिव्य सोहळा प्रत्येक शिव प्रेमींसाठी अविस्मरणीय व आनंदाचा क्षण असून या सोहळ्याचे क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी सोमवार रोजी सकाळी १०.०० वाजता सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.




