ब्रेकिंग

जंतर मंतरवरील लाठीचार्ज म्हणजे लोकशाहीवर झालेला हल्ला – बनसोडे सर

जंतर मंतरवरील लाठीचार्ज म्हणजे लोकशाहीवर झालेला हल्ला – बनसोडे सर

दिल्लीतील जंतर मंतर येथे आपल्या मागण्यांसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतच जर लोकशाहीचा गळा घोटला जात असेल, तर सामान्य जनतेने न्यायासाठी कुठे जायचे? हातात तिरंगा आणि तोंडात घोषणा घेऊन आलेल्या आंदोलकांवर लाठी चालवणे म्हणजे सरकारने संविधानाचाच अपमान केला आहे. महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांवर झालेला हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे. जखमींना तात्काळ उपचार आणि भरपाई मिळाली पाहिजे. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. केंद्र सरकारने लक्षात घ्यावे की, लाठीच्या बळावर आवाज दाबता येत नाही. जर मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर संपूर्ण देशातील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने लढा देऊ, पण अन्याय सहन करणार नाही.

: प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे_

_साकुरी, ता. राहाता_
_संपर्क – 9604797316

ज्योती पतसंस्था

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे