ब्रेकिंग

के.जे.सोमय्या व के.बी.रोहमारे महाविद्यालयात बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न

के.जे.सोमय्या व के.बी.रोहमारे महाविद्यालयात बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न

कोपरगाव:-  के.जे.सोमय्या व के.बी.रोहमारे महाविद्यालय व कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन  यांच्या संयुक्त विद्यमाने .दि.26/07/2026 रोजी खुल्या बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले सदर स्पर्धेत 11,13,15 व 19 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात एकूण 140 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कोपरगाव तालुका  बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संदीपदादा रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही. सी. ठाणगे, उपप्राचार्य प्रा. बी. आर सोनवणे, रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे, कोपरगाव तालुका  बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्री. सागर रोडे ,विविध शाळेतून आलेले  क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी श्री.संदीपजी रोहमारे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगितले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण स्पर्धा या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.11वर्षाआतील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक शुरूद भोईर तर द्वितीय क्रमांक सियान आर्य, 13 वर्षाआतील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक कविष आर्य द्वितीय क्रमांक यश कांबळे,15 वर्षाआतील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक साईश शिंदे द्वितीय क्रमांक वेदांत पगारे,19 वर्षाआतील मुलांच्या गटात  प्रथम क्रमांक वेदांत मोरे, द्वितीय क्रमांक चिराग मुनोत तर 11वर्षा आतील  मुलींच्या गटात प्रथम क्रमांक शरयू तानसरे,  द्वितीय क्रमांक स्वरा वाघोलीकर ,13 वर्षाआतील  मुलींच्या गटात प्रथम क्रमांक दीक्षा हुसळे, द्वितीय क्रमांक आरुषी माने, 15 वर्षाआतील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक सायली माने , द्वितीय क्रमांक दूर्वा पारीख, तर 19 वर्षा आतील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पल्लवी पगारे व  द्वितीय क्रमांक मनीषा देशमुख हिने  मिळविला .शेवटी  सर्व गटातील विजेत्या खेळाडूंना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धा योग्य रीतीने पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे शा.शि. संचालक डॉ. सुनिल कुटे, क्रीडा शिक्षक श्री. मिलिंद कांबळे व बॅडमिंटन कोच अमनकुमार यांनी परिश्रम घेतले.

ज्योती पतसंस्था

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे