ब्रेकिंग
चांदेकसारेच्या पोलिस पाटील सौ. मीराताई रोकडे यांचे निधन; उद्या जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रम


चांदेकसारेच्या पोलिस पाटील सौ. मीराताई रोकडे यांचे निधन; उद्या जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रम
कोपरगाव | प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावच्या पोलिस पाटील डॉ. सौ. मीराताई गोरक्षनाथ रोकडे यांचे निधन झाले असून त्यांच्या स्मरणार्थ जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवारी, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम स्वामीराज लॉन्स, झगडे फाटा, चांदेकसारे, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे. . दिवंगत मीराताई रोकडे यांनी पोलिस पाटील म्हणून गावाच्या सामाजिक व प्रशासकीय कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



