ब्रेकिंग

हरिभक्त परायण संतसेवक अरुण महाराज मगर यांच्या गायनाने व भक्तिमय वातावरणात संपन्न होणार संत सावता माळी पुण्यतिथी सोहळा

हरिभक्त परायण संतसेवक अरुण महाराज मगर यांच्या गायनाने व भक्तिमय वातावरणात संपन्न होणार संत सावता माळी पुण्यतिथी सोहळा

कोपरगाव परिसरातील वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत हरिभक्त परायण संतसेवक ह.भ.प. श्री अरुण महाराज मगर यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करणारा भावपूर्ण कार्यक्रम भक्तिभावात संपन्न होणार. वारकरी परंपरेचा अखंड वारसा जपत, संतवाङ्मयाचा प्रसार आणि समाजात नामस्मरणाची ज्योत ते सातत्याने प्रज्वलित ठेवत असल्याने उपस्थित रहावे

अरुण महाराज मगर यांनी आपल्या वडिलांकडून मिळालेला वारकरी संस्कारांचा अमूल्य ठेवा आजही जपला आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या विचारांचा प्रसार, कीर्तन, प्रवचन आणि हरिनाम सप्ताहांच्या माध्यमातून त्यांनी असंख्य भाविकांच्या जीवनात अध्यात्माची नवी ऊर्जा निर्माण केली आहे.

त्यांच्या साधेपणाचा, सेवाभावी वृत्तीचा, नम्र स्वभावाचा आणि विठ्ठलभक्तीवरील अखंड निष्ठेचा उपस्थितांनी मनःपूर्वक गौरव केला. “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “पांडुरंग हरी” च्या जयघोषाने दुमदुमून जाणार आहे या भक्तिमय वातावरणात संपन्न होणारा हा सोहळा प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणार आहे.अरुण महाराज* यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि अखंड संतसेवेसाठी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. हा कार्यक्रम वारकरी परंपरेतील श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा प्रेरणादायी सोहळा आहे आपण सर्वांनी याला उपस्थित रहावे अशी प्रार्थना संयोजकांकडून करण्यात आली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे