संवत्सर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रभान कर्पे यांचे निधन

संवत्सर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रभान कर्पे यांचे निधन
कोपरगाव ( प्रतिनिधी ), दि. १६ सप्टेंबर २०२६
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर (पढेगाव रोड) येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रभान त्र्यंबकराव कर्पे यांचे मंगळवारी ( दि. १५ सप्टेंबर ) वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते.त्यांच्यावर बुधवारी संवत्सर येथील गोदावरी नदीकाठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कै. चंद्रभान कर्पे हे दिवंगत नेते नामदेवराव परजणे (आण्णा) यांचे निकटवर्तीय सहकारी व स्नेही होते. सामाजिक, राजकीय, धार्मिक तसेच सहकार क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग होता. स्व. परजणे आण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संवत्सर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे सदस्य तसेच उपसभापती म्हणून काम पाहिले. संस्थेमार्फत शेतकऱ्यांना विविध शासकीय व शेतीविषयक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. मनमिळाऊ स्वभाव, समाजाभिमुख वृत्ती आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार निर्माण केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, अरुण, बाळासाहेब व विजय हे तीन पुत्र, श्रीमती मंदाबाई चौधरी व सौ. कलाबाई पुलाटे या दोन कन्या, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.कै. चंद्रभान कर्पे यांच्या निधनाचे वृत्त समजताच गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे , पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे, द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन सावंत, संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर परजणे, कारभारी आगवन, गणेश सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक गोरख शिंदे, ह.भ.प. भानुदास महाराज रोहम, ह.भ.प. कविताताई साबळे, सरपंच सौ. सुलोचनाबाई ढेपले, उपसरपंच विवेक परजणे यांनी शोक व्यक्त करून कर्पे परिवाराचे सांत्वन केले.

संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/JcX8YoNk9gs6W6YGtE20ZI?s=cl&p=a&ilr=0&amv=2
बातम्यासाठी 9175751349 हा नंबर आपल्या व्हाटसाँप ग्रुपला अँड करा
संपादक रवींद्र जगताप


