ब्रेकिंग

जिवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर नियंत्रण आणा; ग्राहक संरक्षण समितीची तहसीलदारांकडे मागणी

जिवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर नियंत्रण आणा; ग्राहक संरक्षण समितीची तहसीलदारांकडे मागणी

राहाता : जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व मजूर वर्गाचे आर्थिक गणित बिघडले असून शासनाने दरवाढीवर तातडीने नियंत्रण आणावे, अशी मागणी ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भगवान दगडू थोरात यांनी राहाता तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात कडधान्य, खाद्यतेल, तांदूळ, गहू, गॅस सिलिंडर, भाजीपाला, बियाणे, खते व कीटकनाशके आदींच्या वाढत्या किमतीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. साठेबाजी व काळाबाजारामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होऊन वस्तूंच्या किमती वाढत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

समितीने साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करून जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी केली आहे. तसेच रेशन दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना चांगल्या दर्जाचा गहू, तांदूळ व इतर धान्य सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावे. रेशन दुकानांच्या उघडण्याच्या वेळेचे फलक लावण्याची मागणीही करण्यात आली आहे.
बाजारपेठेची नियमित तपासणी करून निर्धारित दरापेक्षा अधिक दराने वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यासाठीही उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समितीने केली आहे.या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन निवेदनावर केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भगवान दगडू थोरात यांनी केली आहे.हेमंत पाटील नायब तहसीलदार तालुका राहता जिल्हा अहिल्या नगर यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी अँड. श्री रामभाऊ सदाफळ पत्रकार श्री रवींद्र जगताप पत्रकार श्री शहा मुस्ताक अली श्री दिनकर साळवे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे