ब्रेकिंग

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धांसाठी निवड

कोपरगाव: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर, तालुका क्रीडा समिती कोपरगाव व आत्मा मालिक कुस्ती केंद्र  कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने २३ सप्टेंबर रोजी आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे १४, १७ व १९ वर्षीय शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी विनित पवन हाडा याने १९ वर्षाखालील मुलांच्या ६५ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले आहे. तसेच महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धांमध्ये के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थीनी सप्तमी डहारे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे .व तिची निवड पुणे येथे होणाऱ्या विभागस्तरीय तायक्वांदो  स्पर्धेसाठी झाली आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, विश्वस्त, सचिव व सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे