पुणतांबा शहराचे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ महाराज पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

पुणतांबा शहराचे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ महाराज पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न
संस्थेचे आद्य प्रवर्तक माजी पोलिस पाटील भागवतराव धनवटे संस्थेचे चेअरमन दत्तात्रय झोजे यांचे नेतृत्वाखाली तसेच जेष्ठ संचालक डॉ सुधाकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणतांबा येथील हनुमान मंदिर येथे वार्षिक सभे निमित्ताने संस्थेचा अहवाल सादर करण्यात आला यामध्ये डेली कलेक्शन व ठेविदार तसेच कर्ज वाटप व झालेला नफा यावर संस्थेचे स्विकृत संचालक व पुणतांबा ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच युवक नेते संदिप धनवटे यांनी प्रास्ताविक करताना सविस्तर माहिती दिली सभासद व ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरत आपण ग्रामीण भागातील पंचक्रोशीतील छोटे मोठे उद्योजक यांना कर्ज वाटप करताना कुठलेही राजकारण करत नाही सर्वाना समान न्याय या धर्तीवर आपली यशस्वी वाटचाल सुरू करण्यात आली आहे संस्थेचा उद्देश एकच आहे ग्रामीण भागातील आपण लवकरच संस्था अॉनलाईन करुन सर्व सभासद ठेवीदार दैनंदिन कलेक्शन धारकांना सोशल मीडिया मेसेज द्वारे दैनंदिन माहिती दिली जाणार असुन प्रत्येक सभासद ठेवीदार कलेक्शन धारकांना संस्थेच्या वतीने कौटुंबिक इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ देण्यात येणार आहे असे सांगितले मार्गदर्शकीय भाषणात डॉ सुधाकर जाधव दत्तात्रय झोजे सर्जेराव जाधव दिलीपराव इंगळे यांनी मार्गदर्शन करुन पुढील वाटचाल कशी असावी यावर मार्गदर्शन करुन सभासद ठेवीदार कलेक्शन धारक हे संस्थेचा पाया असुन आम्ही निमित्त व मार्गदर्शक आहे असे जेष्ठ सभासद ठेवीदार दिलिपढराव इंगळे यांनी आपल्या मनोगतात आता या संस्थेचा कारभार युवकांचे व युवा नेते संदिप चांगदेव धनवटे यांच्या हातात दिला आहे असे सांगून भविष्यात त्यांचे हातुन समाजातील वंचित गोरगरीब घटकातील उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल अशी आशा व्यक्त केली पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी यावेळी सभासद ठेवीदार कर्जदार कलेक्शन धारकांनी ठेवीचे माध्यमातून संस्था मोठी करावी आज आपण अल्प ठेवीतुन व डेली कलेक्शन चे माध्यमातून संस्थाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला आहे आजपर्यंत आपण संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात दहा ते पंधरा लाख रुपये कर्ज वाटप केले आहे भविष्यात आपल्याला 2027 पर्यंत संस्थेच्या माध्यमातून कर्ज वाटप एक कोटी पर्यंत नेणार आहेत असे सांगून सभासद ठेवीदार कर्जदार कलेक्शन धारकांना विश्वास दिला आहे आज संस्थेकडे येणाऱ्या पुढील काळात दहा ते वीस लाखांपर्यंत ठेवी जमा होणार आहे त्यातुन आपण डेली कलेक्शन कर्जदारांना कर्ज वाटप करणार आहे असे सांगून संस्थेला वार्षिकसभे निमित्ताने हार्दिक शुभेच्छा संस्था ऊर्जितावस्थेत आणन्यासाठी प्रयत्न करणार आहे असे सांगितले* *यावेळी सभासद ठेवीदार कर्जदार कलेक्शन धारका सह राहाता तालुका पंचायत समिती माजी सदस्य सुभाषराव कुलकर्णी अॅड चांगदेव धनवटे प्रसिद्ध विट उत्पादक विजय निवृत्ती जगदाळे.निवृती रामभाऊ जगदाळे बाबासाहेब जगदाळे विलास धनवटे केशवराव जाधव माळी समाज समता संघटनेचे राहाता तालुकाअध्यक्ष अण्णासाहेब डोखे मेजर शिवाजी वाघमारे बाजीराव वाणी सिध्दार्थ झोजे सत्यम पाणीपुरीवाले गणेश नारायण विश्वासराव विनोद शेळके सुनिल भोईर संजय वाघचौरे यांचे सह सभासद ठेवीदार कर्जदार कलेक्शन धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार चेअरमन दत्तात्रय झोजे यांनी मानले





