डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणणे हीच खरी आदरांजली – नगराध्यक्ष पराग संधान

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणणे हीच खरी आदरांजली – नगराध्यक्ष पराग संधान
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कोपरगावातील आंबेडकर स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ स्मरणापुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या आचरणात आणणे, संविधानातील मूल्यांचे जतन करणे आणि सर्वांना समान संधी मिळेल असा समाज घडविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी केले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कोपरगाव शहरातील भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्ष पराग संधान यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि न्यायाची दिशा दिली. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये समाजासाठी सदैव प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांमुळे समाजात ऐक्याची भावना रुजण्यास मदत झाली आहे. त्यामुळे संविधानातील मूल्यांचे जतन करणे आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे संधान यांनी सांगितले.याप्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत, नगरसेवक संजय उदावंत, नगरसेवक संतोष शिंदे,बौद्धचार्य विजुभाऊ बातंकर,विलास गवळी,दगू साबळे,देवराम पगारे,बाबासाहेब पगारे,अजय दिघे,किरण गायकवाड,नितीन शिंदे,गणेश निळे यांच्यासह विविध कार्यकर्ते, पालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/JcX8YoNk9gs6W6YGtE20ZI?s=cl&p=a&ilr=0&amv=2
बातम्यासाठी 9175751349 हा नंबर आपल्या व्हाटसाँप ग्रुपला अँड करा
संपादक रवींद्र जगताप


