सोमैया महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त व्याख्यान व गुणगौरव…
सोमैया महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त व्याख्यान व गुणगौरव…
कोपरगाव :-नवीन शैक्षणिक धोरणा नुसार राष्ट्रभाषा हिंदी आणि सर्वच भारतीय भाषांना नव्याने महत्त्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी हिंदी आदी सर्वच भारतीय भाषांच्या माध्यमातून करिअरच्या नवीन संधी शोधल्या पाहिजेत, असे मत उत्तर प्रदेश चे माजी शिक्षण व कृषी मंत्री डॉ. रवींद्र शुक्ल यांनी येथे व्यक्त केले. स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या पदव्युत्तर हिंदी विभाग, संशोधन केंद्र, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रभाषा सेवा मंच कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय हिंदी दिन व गुणगौरव समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी राष्ट्रभाषा सेवा मंचचे अध्यक्ष पद्मकांत कुदळे होते.डॉ. शुक्ल यांनी याप्रसंगी हिंदीतील राष्ट्रभक्ती आणि देशप्रेमाने भारावलेल्या काव्यपंक्ती सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच त्यांनी राज्यस्तरीय स्वरचित हिंदी कहानी लेखन स्पर्धेतील विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना पद्मकांत कुदळे म्हणाले की, “हिंदी आणि मराठी तसेच इतरही भारतीय भाषांमधील देशभक्तीपूर्ण काव्याने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला बळ दिले आहे. हिंदी भाषा आणि साहित्याचे देशाच्या सामाजिक एकतेमध्ये मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांनी असे साहित्य वाचले पाहिजे आणि त्याचे चिंतन केले पाहिजे. हिंदी दिनानिमित्त आयोजित स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त करणाऱ्या आणि सहभागी होणाऱ्या सर्वच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मी मनापासून कौतुक करतो.” कार्यक्रमाचे विशेष अतिथी को. ता. एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त संदीप रोहमारे यांनी हिंदी दिनानिमित्त स्पर्धक व इतर विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थितांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा असल्याचे सांगितले. भारतात 50 कोटी पेक्षा अधिक लोक हिंदी बोलतात. जगातील कोणतीही भाषा लहान व मोठी नसते. जनता जेव्हा स्वयंस्फूर्तीने एखाद्या भाषेत संवाद करते, प्रत्येक क्षेत्रात तिचा वापर करते तेव्हाच ती भाषा राजभाषा किंवा राष्ट्रभाषेच्या पदावर पोहोचते. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी हिंदी आणि इतर दोन-तीन भाषांचे ज्ञान प्राप्त करून करिअर केले पाहिजे.असेही ते म्हणाले. याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचारी महेंद्र खंडवे यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.कला शाखा व हिंदी विभाग प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे यांनी प्रास्ताविक व अतिथींचा परिचय करून दिला तर राष्ट्रभाषा सेवा मंचाचे सचिव सुरेश गोरे यांनी हिंदी दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांतील पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे घोषित केली. डॉ. संजय दवंगे यांनी सूत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. डॉ. गणेश शिंदे, प्रा. किरण सोळसे, प्रा. जावेद शहा, प्रा. संपत आहेर, प्रा. सचिन जाधव, प्रा. जगधने, सतीश दवंगे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/JcX8YoNk9gs6W6YGtE20ZI?s=cl&p=a&ilr=0&amv=2
बातम्यासाठी 9175751349 हा नंबर आपल्या व्हाटसाँप ग्रुपला अँड करा
संपादक रवींद्र जगताप


