ब्रेकिंग
आ.विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नातून हिंगणी बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला वेग,दुसऱ्या टप्प्यात १०० नवीन लोखंडी फळ्या दाखल

आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश, दुसऱ्या टप्प्यात नवीन १०० फळ्या उपलब्ध
कोपरगाव तालुक्यातील जलसंधारण आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या हिंगणी बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी शासनदरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, दुसऱ्या टप्प्यात बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आणखी १०० नवीन लोखंडी फळ्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला गती मिळणार आहे.

कोपरगाव मतदारसंघातील विविध बंधाऱ्यांच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणासाठी आमदार कोल्हे यांच्या प्रयत्नांतून एकूण ७ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी १ कोटी १० लाख रुपये हिंगणी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी उपलब्ध झाले आहेत. या कामाच्या पहिल्या टप्प्यात ३५ नवीन लोखंडी फळ्या दाखल झाल्या होत्या. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी १०० फळ्या उपलब्ध झाल्याने पाणी अडविण्याची यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या कामाला चालना मिळाली आहे.