ब्रेकिंग

कोपरगाव तालुक्यातील १६ पाझर तलावांचे गाळ काढून तलावांचे बळकटीकरण करा.. नितीनराव औताडे 

कोपरगाव तालुक्यातील १६ पाझर तलावांचे गाळ काढून तलावांचे बळकटीकरण करा.. नितीनराव औताडे 
मंत्री संजय राठोड यांना दिले निवेदन
 शेती व सिंचनाला दिलासा देण्यासाठी तातडीने कामे करण्याची केली मागणी
कोपरगाव (वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील १६ पाझर तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणीसाठवण क्षमता कमी झाली असून, त्याचा परिणाम सिंचनावर होत आहे. या पाझर तलावांचे गाळ काढून तलावांच्या बळकटीकरण करण्याची कामे तातडीने हाती घेण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजयजी राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.शिर्डी येथे त्यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.

कोपरगाव तालुका हा मुळातच अवर्षणप्रवण क्षेत्र असल्याने १९७२ च्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेतून तालुक्यातील विविध पाझर तलावांची निर्मिती करण्यात आली होती. या पाझर तलावांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असून, शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली होती. मात्र, अनेक वर्षांपासून या तलावांमध्ये गाळ साचल्याने त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे.तालुक्यातील जवळके, रांजणगाव देशमुख, उक्कडगाव, खोपडी, बहादराबाद, उक्कडगाव-२, अंजनापूर, शिरसगाव, पेंदगाव, अंजनापूर-२, शाहापूर, बहादरपूर, अंजनापूर-३, ओगदी, करंजी आणि तिळवणी आदी १६ पाझर तलावांची कामे पूर्वी रोजगार हमी योजनेतून करण्यात आली होती. या तलावांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे ६.०९ दशलक्ष घनमीटर असून, १३०४ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्याची क्षमता आहे.सदर पाझर तलावांमध्ये पावसाचे पाणी साचून पाझर होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. मात्र, तलाव पूर्ण होऊन जवळपास ५६ वर्षे झाल्याने तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. तलावांच्या भिंतीवरही अनेक ठिकाणी काटेरी झुडपे वाढली असून, भरावदेखील काही ठिकाणी खचले आहेत. त्यामुळे पाणीसाठवण क्षमता कमी झाली असून, त्याचा परिणाम सिंचनावर होत आहे.या तलावांचे गाळ काढून त्यांचे बळकटीकरण केल्यास तलावांमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी साठवता येईल. परिणामी परिसरातील पाण्याची पातळी वाढण्यास, शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यास तसेच पाझर तलावांच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होईल.कोपरगाव तालुक्यातील या १६ पाझर तलावांचे गाळ काढून बळकटीकरण करण्याची कामे तातडीने करण्यात यावीत, अशी मागणी नितीनराव औताडे यांनी मंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे