ब्रेकिंग

स्व. शंकरराव कोल्हे यांच्या रिक्त जागेवर ब्राम्हणगांव गटातुन विवेकभैय्या कोल्हे यांची संचालक पदावर बिनविरोध निवड

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ब्राम्हणगांव गटातुन श्री. विवेकभैय्या कोल्हे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे उपस्थित होते. निवडीबददल संचालक मंडळाच्यावतीने श्री. विवेकभैया कोल्हे यांचा सत्कार करतांना उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे व सर्व संचालक.

स्व. शंकरराव कोल्हे यांच्या रिक्त जागेवर ब्राम्हणगांव गटातुन विवेकभैय्या कोल्हे यांची संचालक पदावर बिनविरोध निवड 

संपादक रवींद्र जगताप

कोपरगांव :-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ब्राम्हणगांव गटातुन श्री. विवेकभैय्या कोल्हे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रादेशिक उपसंचालक (साखर) अहमदनगरचे डॉ प्रविण लोखंडे यांनी काम पाहिले. कोविड काळानंतर राज्यातील सहकार क्षेत्रातील नैमित्तिक कारणाने रिक्त झालेल्या पदावर ही पहिलीच निवडणुक पार पडली. कारखान्याचे अध्यक्ष श्री. बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत विवेकभैय्या कोल्हे यांच्या नावाची सुचना संचालक साहेबराव कदम यांनी केली तर त्यास संचालक निवृत्ती बनकर यांनी अनुमोदन दिले. सुरूवातीस कार्यकारी संचालक बाजीराव जी सुतार यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक सर्वश्री. अरूणराव येवले, संजयराव होन, मनेष गाडे, सोपानराव पानगव्हाणे, शिवाजीराव वक्ते, विलासराव वाबळे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर परजणे, फकिरराव बोरनारे, अशोकराव औताडे, प्रदिप नवले, मच्छिंद्र लोणारी, वेणुनाथ बोळीज, संगिता नरोडे, सोनुबाई भाकरे, बाळासाहेब नरोडे, अशोकराव भाकरे तसेच भारतीय शुगरचे प्रेसिडेंट श्री. विक्रमसिंह शिंदे, चीफ ऑपरेटींग ऑफिसर श्री. संग्रामसिंह शिंदे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, एच. आर. मॅनेजर प्रदिप गुरव, सचिव तुळशीराम कानवडे, आदि उपस्थित होते. सत्कारास उत्तर देतांना श्री. विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी खाजगीशी संघर्ष करून सहकाराचा नांवलौकीक देशपातळीवर वाढविला, त्यांच्या रिक्तपदावर काम करतांना त्यांचे विचारांचा वारसा टिकवून महाराष्ट्र राज्याबरोबरच देशात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचा लौकीक वाढवून सहकारी चळवळीला समृध्दीची दिशा देवुन याहीपेक्षा मोठे काम करण्याची संधी यानिमीत्ताने आली आहे त्याला सभासद शेतकरी, व्यवस्थापन मंडळ, सर्व ज्ञात अज्ञात घटकांच्या सहकार्याने कुठेही तडा जाउ देणार नाही असा विश्वास व्यक्त करत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकाराच्या माध्यमातुन तळागाळातील सभासद शेतक-यांचा उत्कर्ष साधला असल्याचे ते म्हणाले. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले. अहमदनगर प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे शंकर सुरम यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे