आरोग्य व शिक्षण

आपले आरोग्य जपणे आपल्याच हातात-सौ.पुष्पाताई काळे

सुप्रसाध हॉस्पिटल व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत सर्वरोग निदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सौ.पुष्पाताई काळे.
आपले आरोग्य जपणे आपल्याच हातात-सौ.पुष्पाताई काळे
संपादक ;- रविंद्र जगताप
कोळपेवाडी येथे मोफत सर्वरोग निदान शिबिर संपन्न
कोळपेवाडी वार्ताहर- आजच्या धावपळीच्या युगात आपल्या आरोग्याकडे कुणालाच व्यवस्थित लक्ष  देता येत नाही. त्यामुळे अचानकपणे मोठ्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. आपले आरोग्य जपणे हे आपल्याच हातात असून आपले आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी मोफत सर्वरोग निदान शिबिर उपयोगी ठरणार असल्याचे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी सांगितले. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव व  सुप्रसाध हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत सर्वरोग निदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, आपण स्वतःचे आरोग्य जपले तरच आपण आपले कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकतो म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.  या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घेवून निरोगी व तंदुरुस्त राहावे असे सौ.पुष्पाताई काळे यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी सुप्रसाध हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रकाश कोळपे, सौ.सुरेखा कोळपे, डॉ.धनंजय कोळपे, डॉ.गंगासागर कोळपे, डॉ.राजश्री कोळपे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सौ.वैशाली आभाळे, सरपंच सौ.चंद्रकला कोळपे, डॉ.आय.के. सय्यद, डॉ. प्रीती देसाई, डॉ. मेहेरबान सिंग, डॉ.आशिष जऱ्हाड, सौ.राजश्री पारचे, सौ.सुनिता कोळपे, गणेश पारचे, सागर कोळपे आदींसह रुग्ण उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे