ब्रेकिंग

सहकार महर्षी कोल्हे कारखाना आणि श्री गणेशनगर कारखाना झेंडावंदन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते संपन्न 

सहकार महर्षी कोल्हे कारखाना आणि श्री गणेशनगर कारखाना झेंडावंदन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते संपन्न 
कोपरगाव – भारतीय स्वातंत्र्य दिनाचे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व श्री गणेश सह.साखर कारखान्याचे झेंडावंदन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते पार पडले.प्रत्येक क्षेत्रात भरीव योगदान देऊन आपण राष्ट्रसेवा करू शकतो.विविध संस्कृतींनी नटलेल्या भारत मातेच्या विकासाची वाटचाल नव्या पिढीने आपल्या ज्ञानाने अधिक गतिमान करावी.भारत जगाच्या पातळीवर एक शक्तीशाली देश म्हणून पुढे येतो आहे.
याप्रसंगी कोल्हे कारखाना येथे संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, संचालक विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर होन, सतीश आव्हाड, राजेंद्र कोळपे, विलासराव वाबळे, रमेश आभाळे, रमेश घोडेराव, निवृत्ती बनकर, निलेश देवकर, ज्ञानेश्वर परजणे, ज्ञानदेव औताडे, संजय औताडे, बापूसाहेब बाराहाते, त्र्यंबकराव सरोदे, विलासराव माळी, बाळासाहेब पानगव्हाणे, आप्पासाहेब दवंगे, बाळासाहेब वक्ते, कामगार नेते मनोहर शिंदे, उपाध्यक्ष गणपतराव दवंगे, वेनुनाथ बोळीज, फकीरराव बोरणारे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, सचिव तुळशीराम कानवडे, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, संचालक, सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, कामगार, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात
यासह श्री गणेशनगर सहकारी साखर कारखाना येथील झेंडा वंदन विवेकभैय्या कोल्हे हांच्या हस्ते पार पडले.राष्ट्र ऐक्य आणि विकासाची घोडदौड देशाने करण्यासाठी नव्या पिढीचे योगदान अतिशय महत्वाचे ठरणार आहे असे मत व्यक्त केले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध कार्यक्रमांचे सुरेख सादरीकरण केले. अनेक संधी आहेत त्यात आपली चुणूक दाखवत यश संपादन केल्यास प्रगती निश्चित होते त्यासाठी धाडस आणि प्रयत्नाची शर्थ केल्यास वैचारिक स्वातंत्र्याचा परिणाम सकारात्मक होतो.
यावेळी कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, व्हा.चेअरमन विजय दंडवते,संचालक भगवान टिळेकर,अनील गाढवे,बाळासाहेब चोळके, मधुकर सातव,संपत हिंगे,आलेश कापसे,विष्णुपंत शेळके,अरविंद फोफसे,महेंद्र गोर्डे पा.,राहुल गाढवे,संजय गाढवे,एम.डी. नितीन भोसले तसेच सर्व शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कोपरगाव शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदान, टि.डी.बी येथे भाजपा कार्यालय आणि काँग्रेस कमिटी झेंडावंदन मोठ्या उत्साहात पार पडले.सर्वच ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते,शहरातील प्रतिष्ठित नागरिक,आजी माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे