ब्रेकिंग

माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास १०२ पुस्तकांची भेट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयालयास माजी आमदार अशोकरावजी काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भेट देण्यात आलेली १०२ पुस्तके स्विकरतांना मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी

माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास १०२ पुस्तकांची भेट
कोपरगाव प्रतिनिधी  – कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार माजी आमदार अशोकरावजी काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील नगर परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या वतीने नुकतीच १०२ पुस्तकांची भेट देण्यात आली आहे.वाचनामुळे आपण ज्ञान संपादन , विचार शक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. वाचनामुळे आपण सुशिक्षित होतो.सुसंस्कृत व्यक्तिमत्व घडविण्यासाठी पुस्तकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला परिपूर्ण ज्ञान मिळते.पुस्तके वाचनाने जगाबद्दल ज्ञान प्राप्त होवून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. वाचनाचा महिमा अनेक महान व्यक्तींनी सांगितला आहे. त्यामुळे सर्वाँना वाचनाची आवड व गोडी निर्माण व्हावी यावसाठी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास १०२ पुस्तके भेट देण्यात आली. ही पुस्तके मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांनी स्वीकारली.
यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी सोशल मेडिया सेल शहराध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, माजी नगरसेवक रमेश गवळी, दिनकर खरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, जावेद शेख, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, राजेंद्र खैरनार, आकाश डागा, रहेमान कुरेशी, अनिरुद्ध काळे, सागर लकारे, फिरोज पठाण, नगरपरिषद अभियंता रोहित सोनवणे, ग्रंथपाल महेश थोरात, मदतनीस सारिका राझे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे