नगरपालिका निवडणुक प्रभाग रचना जाहिर होताच सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांनी निवडणूक लढवण्याची जनतेकडुन मागणी
नगरपालिका निवडणुक प्रभाग रचना जाहिर होताच सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांनी निवडणूक लढवण्याची जनतेकडुन मागणी

कोपरगाव:-नगरपालिका निवडणुकीसाठीचे नुकतीच प्रभागरचना जाहिर होऊन आरक्षण जाहिर करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक १४ सर्वसाधारण झाल्याने प्रभाग क्र १४ मधुन जनतेकडुन कोपरगाव चे विविध सामाजिक प्रश्न मांडणारे सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांनी निवडणुक लढवावी अशी प्रभागात अंतर्गत चर्चा जनतेतुन होत आहे नगरपालिका निवडणूक ऑगस्ट अखेर अथवा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक लोक हे स्थानिक नेत्यांकडे उमेदवारी मिळावा म्हणुन प्रयत्न करत आहे. तसेच नगरपालिकेत आजवर निवडुन येणारे नगरसेवक हे फक्त निवडणुकी पुर्ते जनतेच्या पायी लोटांगण घालतात आणि पाच वर्ष पुर्ण होतांना पाचव्या वर्षी जनतेत फिरता इतर वेळी मात्र जनतेला अनेक जटील प्रश्नांना सामोरं जावं लागते तेव्हा मात्र कोणी काम येत नाही नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जनतेच्या अडचणी पेक्षा इतर बाबींवरच राजकिय कलह होतात तिथं जनतेचे प्रश्न मांडणारे लोकप्रतिनिधी हे व्यक्तीगत असुड उगवताना दिसता असा काळात मात्र कशाची अपेक्षा न करता मात्र किशोर चोरगे सारखे सामाजिक कार्यकर्ते हे जनतेच्या समस्या शासन दरबारी मांडत असतात आता जनतेला हि कळलं आहे कि नविन चेहऱ्यांना संधी दिली तरच आजवर जे काम झाले नाही ते काम होऊ शकता प्रभागाचे प्रश्न सुटु शकता म्हणुन कोपरगावात सामाजिक कार्यकर्त्यांना जनतेची पसंती दिसते आहे . जनतेत खाजगीत बोललं जातं आहे कि पक्ष संघटना यांना अनेकदा जनतेने संधी दिली पण आजवर जे प्रश्न प्रभागात आहे ते तसेच आहे समस्त कोपरगावच हेच चित्र आहे ते बदलण्या करता युवक युवतींना सामाजिक कार्यकर्ते यांना नगरपालिका निवडणुकीत निवडुन देत नेत्वृत्व करण्याची संधी जनता देण्याच्या विचारात दिसते आहे आणि या विचारांची संकल्पना मांडणारे विकासाची नविन नविन व्याख्या सांगणारे सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांची जनतेत याच कारणाने चर्चा आहे कोपरगावात पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्यांच्या यादीत जर नविन युवा नसले नसले तर पक्षांना हि यांची अल्पशा हानी होऊ शकते सोशल मिडिया तुन राजकिय कलगीतुरे जनतेने पाहिले आहे विकासा ऐवजी राजकिय आगडोंब उठल्याने शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे कोपरगाव शहरात सामाजिक कार्यकर्ते यांना पक्ष संधी देऊ अगर नाही पण जनता मात्र नगरपालिकेत जाण्याची संधी देणार हे नक्की असं चित्र काहीसे कोपरगावात तयार झाले आहे मागिल गेल्या राजकारणाचा फटका हा बसणारच पण जर का पक्षांनी कोपरगावातील युवक युवती आणि सामाजिक कार्यकर्ते यांना नगरपालिकेला संधी दिली तर चित्र काहीसे वेगळे असेन यात शंका नाही हे सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांना जनतेची पसंतीने सध्याचे राजकारणाचा चेहरा बदलण्याचे चित्र दिसते आहे यात शंका नाही



