मा. नगराध्यक्ष मंगेश पाटील आयडॉल महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित



मा. नगराध्यक्ष मंगेश पाटील आयडॉल महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित
कोपरगावच्या इतिहासात २००९ साली सर्वात कमी म्हणजे फक्त साडेचार महिने नगराध्यक्षपद मिळाले असताना मंगेश पाटील यांनी आपल्या अल्प कार्यकाळात शहराच्या विकासासाठी केलेले प्रयत्न जेणेकरून गावाची बाजारपेठ वाढेल यासाठी केलेले प्रयत्न ५ नंबर पिण्याच्या पाण्याच्या साठवण तळ्यां साठी उभारलेले जनआंदोलन व इतर करत असलेल्या सामाजिक कामाची दखल घेवून सकाळ वृत्तपत्र समुहाच्याने राज्याचे आदर्शगाव संकल्प व कृती समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार,समवेत विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र मा.डॉ .बी.जी.शेखर,प्रसिद्ध अभिनेते मा.मिलिंद शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक मा.मनोज पाटील,अहमदनगर महापालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे,सकाळचे नगर आवृत्तीचे संपादक प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत आयडॉल महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित केले,त्या बद्धल सकाळ समूहाचे पाटील यांनी मानले आभार आहे कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाच्या आंदोलनात ज्या ज्या लोकांनी संघटनांनी विविध वृत्तपत्र,न्यूज चॅनेल,पत्रकार बांधव ,पक्ष विरहित समुहांनी तसेच माता भगिनींनी सक्रिय सहभाग घेतला,त्या सर्व नागरिकांचे मंगेश पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले व हा माझा सन्मान नसुन कोपरगावच्या विकासासाठी झटणाऱ्यांचा असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगतीले ते पुढे म्हणाले की पाण्याचे श्रेय खरे हे सर्व एकत्रीत जनतेचे नागरिकांच्या लढ्याचे,पाणी संघर्ष समिती चे असुन आपण आधीपासून ठाम पणे ही गोस्ट सर्वांच्या निदर्शनास आणून देत होतो की येसगाव येथील २५ एकर जागेतील ५ नंबर साठवण तळ्यांचे काम झाल्यशिवाय कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटणार नाही.ना .आमदार आशुतोष काळे यांनी मात्र ही गोष्ट गांभीर्याने लक्षात घेवून त्याचा पाठपुरावा केला आणि १३१कोटी येवढा प्रचंड निधी आणला त्या बद्धल माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी ना.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.




