क्रिडा व मनोरंजन

गोविंदा पथकांनो लागा तयारीला,कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी सुरू,

गोविंदा पथकांनो लागा तयारीला,कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी सुरू,

पदाधिकाऱ्यांच्या निवडी ना.आशुतोष काळेंनी केल्या जाहीर

कोपरगाव  — गोविंदा पथकांसाठी खुशखबर असून येणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरू केली असून गोविंदा पथकांना दहीहंडीसाठी आवश्यक सुविधा व नागरिकांना दहीहंडी उत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ना.आशुतोष काळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत.मागील दोन वर्ष संपूर्ण विश्वावर जीवघेण्या कोरोना महामारीचे संकट होते. त्यामुळे मोठ्या संख्येने एकत्र येण्यास बंदी असल्यामुळे दरवर्षी होणारा दहीहंडी उत्सव कोपरगाव शहरात साजरा करण्यात आला नव्हता.त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण होते.मात्र यावर्षी गोविंदा पथकांसाठी खुशखबर देण्यात आली असून कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्याचीजय्यत तयारी सुरू केली आहे. ही गोविंदासाठी खुशखबर आहे. हा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यामध्ये अध्यक्षपदी चंद्रशेखर म्हस्के यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी विजय नागरे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी रोशन शेजवळ तर संदीप देवळालीकर यांची सचिवपदी तर चंद्रकांत धोत्रे यांची सहसचिव पदी निवड करण्यात आली आहे. खजिनदारपदी शुभम लासूरे, संघटकपदी अक्षय पवार तर सहसंघटक इम्रान पठाण यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे