ब्रेकिंग

समाजाची संकटं सोडविणारा (वि) नायक मराठा समाजाला पारकं करून गेला _सौ. स्नेहलताताई कोल्हे

समाजाची संकटं सोडविणारा (वि) नायक मराठा समाजाला पारकं करून गेला _सौ. स्नेहलताताई कोल्हे
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगांव : समाजाची संकट सोडवत असताना काळाने अचानक घाला घालने हे नियतीला न पटणारे आहे मराठवाड्याचा (वि) नायक आपल्याबरोबरच मराठा समाजाला पारकं करून अकाली निघून गेल्याने राज्याची मोठी हानी झाली अशा शब्दात भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी शोक व्यक्त केला. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनीही विनायक मेटेंच्या अकली अपघाती निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली. सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत मराठा समाजाच्या प्रश्नावर ज्या ज्या वेळी शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी बैठका घेतल्या त्याप्रसंगी उपस्थित राहून त्यांचे विचार ऐकण्याची संधी मला मिळाली होती. सहकारमहर्षी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे व शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे हे नेहमीच विधिमंडळात भेटत ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्याकडून ते सातत्याने मार्गदर्शन घेत. स्व. विनायक मेटे म्हणजे शांत, संयमी आणि प्रश्नाच्या खोलाशी जाऊन मार्ग काढणाऱ्या व्यक्तिमत्व होतं. समाजाच्या सुखदुःखाची सोडवणूक करणाऱ्या व्यक्तिमत्वiला नियतीने अशा पद्धतीने आपल्यातून घेऊन जावे हे मनाला पटत नाही. 1996 पासून सलग 26 वर्ष विधिमंडळ गाजवून मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा लढा देऊन सोडवणारा नेता अंतिम टप्प्याच्या क्षणी आपल्यातून हिरावला जाणं यावर अजूनही विश्वास बसत नाही त्यांच्या आत्म्याला ईश्वर चिरशांती देवो ही संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने श्रद्धांजली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे