महाराष्ट्र शासनाच्या जाचक अटींमुळे राज्यातील 900 सिंगल चित्रपटगृहे बंद?जाचक अटी शिथिल करा.:-.बाबासाहेब पाटील

महाराष्ट्र शासनाच्या जाचक अटींमुळे राज्यातील 900 सिंगल चित्रपटगृहे बंद?जाचक अटी शिथिल करा.:-.बाबासाहेब पाटील
हेमंत शेजवळ
शिर्डी प्रतिनिधी:-मल्टिप्लेक्समुळे मनोरंजनामध्ये अत्याधुनिक बदलते पर्याय मिळाल्यामुळे प्रेक्षकांची एकपडदा चित्रपट गृहांकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येते परिणामी राज्यातील सुमारे 900 चित्रपटगृह बंद पडले आहेत.अशातही चित्रपटगृहे बंद न करण्याचा महाराष्ट्र शासन नियमाचा फटका हा सिंगल स्क्रीनला म्हणजे एक पडदा चित्रपटगृहांना बसत आहे. राज्यातील उरलेसुरली काही सिंगल चित्रपट गृहे हे अखेरची घटका मोजत असताना त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी आपल्या राज्य सरकारकडून कोणतेही शर्तीचे प्रयत्न होताना दिसत नाही,शासनाने ही चित्रपटगृहे बंद करण्याला तात्काळ परवानगी द्यावी अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.कोरोना नंतर बरीच चित्रपटगृहे बंद पडली आहे पूर्वी भारतात 12 ते 15 हजार सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे होती ती संख्या आज हजारोनी खाली आली आहे, तर महाराष्ट्रात मंत्री बने, सांस्कृतिक कार्म भरायण 1200 चित्रपटगृहांची संख्या जाचक नियमांमुळे 900 एक पडदा चित्रपटगृहे बंद पडल्याने संख्या आता 350 वर आली आहे,यातीलही 70 टक्के चित्रपटगृहे बंद आहेत, त्यांना कायमचे चित्रपटगृह बंद करण्याला परवानगी मिळत नाही त्या जागेत बांधकाम करायचे झाल्यास एक तृतीयांश भागात चित्रपटगृह बांधणे सक्तीचे केले आहे. जर प्रेक्षकच येत नसतील तर चित्रपटगृह बांधून काय करायचे असाही सवाल चित्रपटगृह मालकांनी सांस्कृतिक मंत्र्यांना अनेक वेळा हा प्रश्न उपस्थित केला आहे कारण आजही शासन चित्रपटगृह बंद असली तरी त्यांच्याकडे करमणूक कर, वीज बिले, प्रॉपर्टी टॅक्स, घरफाळा, याशिवाय कामगार, पगार,फंड, मेंटेनन्स या सगळ्यांवर चित्रपटगृह मालकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात त्या तुलनेत उत्पन्न मात्र काहीच नसल्याने चित्रपटगृह मालकांची अवस्था दयनीय झाली आहे
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

हिंदी व मराठी तसेच अन्य भाषिक चित्रपट पाहण्याचा एकमेव पर्याय म्हणजे चित्रपटगृह होता जिथे चित्रपटगृह नव्हती तिथे टुरिंग टॉकीज होते. जत्रा-यात्रा काळात हे टुरिंग टॉकीज़ प्रेक्षकांचे मनोरंजनाचे साधन मोठे होते. कालांतराने दूरदर्शन आले, व्हिसीआर आला.आता सीडी व नव्याने मोठ्या प्रमाणावर ओटीटी प्लॅटफॉर्म त्याचबरोबर हातातील मोबाईलवरही चित्रपट पाहणे शक्य झाल्याने चित्रपटगृहांचे महत्त्व हे कमी होत चालले आहे. वीस वर्षापूर्वी भारतात आलेल्या मल्टिप्लेक्स ने शिस्तबद्धपणे मार्केटिंग करत अत्याधुनिक सुविधा देत देशातील अनेक शहरांमध्ये आपले जाळे पसरवले याच काळात सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित होऊ लागली


