सामाजिक

” पोलीस मित्र ” म्हणून माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील ( शांतता कमिटी सदस्य ) यांना १५ ऑगस्टला सन्मानपत्र देऊन गौरवन्यात आले.

” पोलीस मित्र ” म्हणून माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील ( शांतता कमिटी सदस्य ) यांना १५ ऑगस्टला सन्मानपत्र देऊन गौरवन्यात आले.

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी :-कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी ( शिर्डी )संजय जी सातव साहेब यांच्या हस्ते व कोपरगाव चे तहसीलदार विजय जी बोरुडे साहेब , पंचायत समितीचे बिडिओ सूर्यवंशी साहेब , कोपरगाव चे पोलीस निरीक्षक वासुदेव जी दिसले साहेब यांच्या उपस्थितीत , ७५ व्या स्वतंत्र दिनानिमित्य कोपरगाव पोलीस स्टेशन येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव गौरव पोलीस मित्राचा या आंतर्गत माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना पोलीस मित्र म्हणून सन्मान करण्यात आला.कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व जनता समन्वय सुमधुर ठेवत जनतेच्या रक्षणासाठी व शांतता राहावी या साठी वेगवेगळ्या पध्दतीने , वेळी , पोलीस यांना करत असलेल्या सहकार्या साठी हा सन्मान करण्यात येतो.यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे , स्वच्छता दुत सुशांत घोडके , उर्दू शाळेचे रियाज शेख सर , व्यापारी नारायण शेठ अग्रवाल , संजय जगताप , अमित खोकले , सुशांत खैरे व इतर माननीय नागरिक , पत्रकार बांधव व वनिता महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. वंदना चिकटे , सौ.मिनलताई खांबेकर , सौ.जोस्नाताई पगारे , सौ.वैशाली आढाव , सौ जाधव मॅडम व इतर माननीय महिला भगिनी यांनाही सन्मानित करण्यात आले.यावेळी देशभक्ती पर गीत गायनाचा मैफिल ” ये वतन तेरे लिये ” शारदा संगीत विद्यालय च्या टीव्ही स्टार सुरभी कुलकर्णी यांचा आयोजित करण्यात आला होता. तसेच ठोंबरे साहेब यांनीही गाणे म्हणले. यावेळी लहान मुलाच्या चित्रकला स्पर्धेतील विजयी झालेल्या मुला मुलीचा ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. डीवाएसपी सातव साहेब व तहसीलदार बोरुडे साहेब यांनी कोपरगाव च्या या नुतून पोलीस स्टेशन मध्ये पहिल्यांदा असा आगळा वेगळा समाज हिताचा १५ ऑगस्ट चा कार्यक्रम देसले साहेब यांच्या पुढाकाराने घेण्यात आला व डिव्हिजन मध्ये एक नंबर काम / कार्यक्रम त्यांचा झाला, म्हणून विशेष कौतुक केले.पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब , पीएसआय रोहिदास ठोंबरे , पीएसआय भरत दाते , पोलीस खारतोडे व सर्वे पोलीस स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले. कोपरगाव करांच्या कायम लक्षत , स्मरणात राहील असा हा आगळावेगळा कार्यक्रम पोलीस स्टेशन ला झाला.कार्यक्रमाचे सूत्र संचलन सौ.राजश्री पिंगळे मॅडम यांनी त्यांच्या विशेष शैलीत १५ आगस्ट च्या धर्तीवर कार्यक्रमाची रंगत वाढवत केली.

उइ

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे