ब्रेकिंग

पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेची १५% लाभांश देण्याची परंपरा, आर्थिक बळकटी अधोरेखित : ना. आशुतोष काळे

पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करतांना ना. आशुतोष काळे, समवेत संस्थेचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे, चेअरमन राधु कोळपे, कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते आदी

पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेची १५% लाभांश देण्याची परंपरा, आर्थिक बळकटी अधोरेखित : ना. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी :- सहकारी संस्था चालवतांना आर्थिक शिस्त जपून संस्थेशी निगडीत असणाऱ्या घटकांचे हित जोपासले पाहिजे हि शिकवण कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी दिली आहे. त्यांच्या आदर्श विचारांवर व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेने दरवर्षी १५ % लाभांश देण्याची सुरु ठेवलेली परंपरा संस्थेची आर्थिक बळकटी अधोरेखित करीत असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवारसाहेब नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२१-२२ या वर्षाची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गौतम बँकेच्या गौतमनगर येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करतांना ना.आशुतोष काळे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राधुजी कोळपे होते.ते पुढे म्हणाले की, मागील दोन वर्ष आलेली कोरोनाची आव्हानात्मक परिस्थितीत व इतरही आव्हानांचा देखील पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवारसाहेब नागरी सहकारी पतसंस्थेने समर्थपणे सामना करून याहीवर्षी सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली हि अभिमानास्पद बाब आहे. कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह व गौतमनगर परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक व व्यापारी तसेच ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी पतसंस्था आधारवड बनली आहे. संस्थेने संपादन केलेल्या विश्वासाच्या बळावर ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून नियमित व वेळेवर कर्ज पुरवठा करणे व त्याची नियमित कर्ज वसुली करणे,ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी मागणी प्रमाणे तत्काळ परत करीत आहे त्यामुळे संस्थेच्या ठेवीत सातत्याने वाढ होत आहे. यावरून संस्थेवर कर्जदार, ठेवीदार यांचा दृढविश्वास असल्याचे सिद्ध होत आहे. यापुढील काळातही संस्थेने असाच नियोजनबध्द कारभार करून संस्थेची आर्थिक भरभराट साधावी असे आवाहन ना. आशुतोष काळे यांनी यावेळी केले.दिनांक ३१/०३/२०२२ अखेर संस्थेकडे ३४ कोटी ०३ लाखाच्या ठेवी होत्या यामध्ये सातत्याने वाढ सुरुच असून आज अखेर ३६ कोटीच्या ठेवी आहेत. अहवाल सालात संस्थेने २३ कोटी ३२ लाख कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेची कर्ज वाटपाचे श्रेय कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहातील कर्मचारी, सभासद बंधू तसेच परिसरातील छोटे-मोठे व्यावसायिक यांनाच आहे.संस्थेचे थकबाकीचे प्रमाण २.९२% आहे.संस्थेचा ढोबळ एन.पी.ए. १३.३७% असून संस्थेने एन.पी.ए. तरतूद रुपये ६ कोटी ६५ लाख ५० हजारांची केली आहे. १००% एन.पी.ए.ची तरतूद केल्यामुळे निव्वळ एन.पी.ए. ० % आहे. सहकार कायद्यानुसार २२ कोटी ३९ लाखाची गुंतवणूक केली असून लेखा परीक्षण अहवालानुसार संस्थेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून ७३ लाख ५९ हजार रुपयांचा नफा पतसंस्था आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचे सिद्ध होत असून त्याबद्दल ना. आशुतोष काळे यांनी पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांचे कौतुक केले.सभेच्या अध्यक्षपदाची सुचना अशोकराव आहेर यांनी मांडली त्यास शिवाजीराव वाबळे यांनी अनुमोदन दिले. यावेळी २०२१-२२ या आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजलीचा ठराव व्हा.चेअरमन सोपानराव गुडघे यांनी मांडला. अहवाल वाचन संस्थेचे मॅनेजर काळे बी. डी. यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष बढे यांनी केले तर आभार व्हा. चेअरमन सोपानराव गुडघे यांनी मानले. यावेळी सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, सचिन चांदगुडे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, शंकरराव चव्हाण, सुनील मांजरे, सुभाष आभाळे, माजी संचालक ज्ञानदेव मांजरे, अरुण चंद्रे, सोमनाथ घुमरे, बाबुराव कोल्हे, सोमनाथ कांगणे, नानासाहेब चौधरी, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, व्हा.चेअरमन धोंडीराम वक्ते, कुक्कुट पालनचे व्हा.चेअरमन विजय कुलकर्णी, कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे