महाराष्ट्र

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजनप्रसंगी चेअरमन ना. आशुतोष काळे, समवेत ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक मंडळ व पदाधिकारी

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२३ या ६८ व्या गळीत हंगामाच्या तयारी करण्याच्या दृष्टीने नवीन मिल रोलरचे पूजन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी बोलतांना चेअरमन आ.आशुतोष काळे म्हणाले की, मागील गळीत हंगामात कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नोंदविलेल्या सर्व ऊसाचे गाळप करून मागील वर्षीचा उंचाकी गळीत हंगाम यशस्वी करून कारखान्याची ६८ व्या गळीत हंगामाची तयारी सुरु झाली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने कारखान्याचे पहिल्या टप्प्यातील आधुनुकीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील वर्षीच्या गाळप हंगामाची तयारी नवीन मिलचे रोलर पूजनाने करण्यात आली आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून पर्जन्यमान समाधानकारक असल्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे व भविष्यात देखील यामध्ये वाढ होवू शकते. त्यादृष्टीने कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यातील काम चालू वर्षी मुदतीच्या आत पूर्ण होणार आहे. पुढील वर्षी दुसऱ्या टप्यातील कामास प्रारंभ होवून आधुनिकीकरणाचे सर्व काम पूर्ण झाल्यावर अतिरिक्त सर्व ऊसाचे वेळेत गाळप होण्यास मोठी मदत होणार असल्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, प्रवीण शिंदे, शंकरराव चव्हाण, अनिल कदम, अशोक मवाळ,सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, डॉ. मच्छिंद्र बर्डे,शिवाजीराव घुले,दिनार कुदळे,सुरेश जाधव, विष्णू शिंदे, प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बी. बी. सय्यद, असि. सेक्रेटरी एस.डी. शिरसाठ, फॅक्टरी मॅनेजर दौलतराव चव्हाण,चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चीफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, फायनान्स मॅनजर सोमनाथ बोरनारे विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे