“सफाई कामगार महिलांना साडी वाटप”
“सफाई कामगार महिलांना साडी वाटप”
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव येथील मुस्लिम विकास कमिटीचे शफिक भाई सय्यद यांनी सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने कोपरगाव नगर पालिकेच्या ठेकेदारी वर सफाई काम करणाऱ्या महिलांना साडी वाटप केले कोपरगाव येथील मुस्लिम विकास कमिटीच्या वतीने नुकतीच सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली मुस्लिम विकास कमिटीचे शफिक भाई सय्यद हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या पुस्तके आदी प्रकारे आर्थिक मदत करतात या वर्षी सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या वतीने नगर पालिकेच्या ठेकेदारी वर सफाई काम करणाऱ्या महिलांना त्यांनी साडी वाटप केली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुस्लिम विकास कमिटीचे आयुब शेख हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण साबळे यांनी तर सूत्र संचालन पत्रकार संजय लाड यांनी केले यावेळी लोक स्वराज्य आंदोलनाचे नितीन पोळ ,शफिक सय्यद,आयुब भाई शेख,लक्ष्मण साबळे आदी उपस्थित होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी महिलांना साडी वाटप उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे




