करंजी येथील हायस्कूलचे विद्यार्थी देशांमध्ये नाव लौकिक:- शिवसेना उप तालुकाप्रमुख कृष्णा आहिरे
करंजी येथील हायस्कूलचे विद्यार्थी देशांमध्ये नाव लौकिक:- शिवसेना उप तालुकाप्रमुख कृष्णा आहिरे
संपादक:- रविंद्र जगताप
करंजी येथील कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सुरज पोपट जगताप दहावी चा विद्यार्थी या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे सुरज या विद्यार्थ्याने तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्याची तालुका स्तरामध्ये निवड झाली त्यानंतर जिल्हात निवड झाली तसेच राज्यामध्ये निवड झाल्यानंतर आता राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये त्याची निवड झाली आहे त्याने हायड्रोलिक मशीन तयार केले आहे यापासून पेरणी, औषध फवारणी, मशीन तयार केले आहे या मशीन पासून अनेक फायदे होणार आहेत एक सोप्या पद्धतीने शेती कशी मशागत करता येईल यादृष्टीने ही मशीन बनवण्यात आली आहे राष्ट्रीय पुरस्काराने पण सन्मानित करण्यात येणार आहे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद अण्णा लबडे यांनी सांगितले पुढच्या इंटरनॅशनल लेवलला पूर्णपणे तुला मदत केली जाईल शिवसेना कोपरगाव तालुक्याच्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद अण्णा लबडे यांनी सत्कार केला तसेच शिवसेना उप तालुकाप्रमुख कृष्णा अहिरे यांनी ज्या शिक्षकांनी सुरज याला घडवले ते करंजी शाळेचे शिक्षक संदीप चव्हाण यांचे सुरज मागे मोलाचे योगदान आहे अशा अनेक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यास प्रवृत्त करावे जेणेकरून गावाचे व तालुक्याचे नाव देशभरात लौकिक होईल
पुढील वाटचालीस शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी राजे ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या



