लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावच्या वतीने वस्त्रदानाचा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.कोपरगावकरांच्या दातृत्वाला सलाम :-अनिरुध्द काळे

लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावच्या वतीने वस्त्रदानाचा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.कोपरगावकरांच्या दातृत्वाला सलाम :-अनिरुध्द काळे
कोपरगाव प्रतिनिधी :- लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावच्या वतीने वस्त्रदानाचा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामध्ये भरभरून प्रतिसाद दिलेल्या सर्व कोपरगावकरांचे मनःपुर्वक आभार. आपण सर्वांनी केलेल्या वस्त्रदानामुळे अनेक गरजू नागरिकांना नक्कीच फायदा होईल.आपण कोणी मोठे समाजसेवक नाही. किंवा आपल्याला कोणी समाजसेवक म्हणावं अशीही आपली इच्छा नसते पण आपल्या आसपास आपण अनेक गरजू नागरिकांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करताना बघतो त्यावेळी आपले काळीज नक्कीच पिळवटून निघते आणि अशा गरजू लोकांना मदत करावी अशी आपल्या प्रत्येकाची इच्छा असते पण आपल्याला त्यासाठी मार्ग सापडत नाही. आपली सर्वांची ही गरजू नागरिकांना मदत करण्याची इच्छा आज काही प्रमाणात लायन्स व लिओ क्लबच्या माध्यमातून पूर्ण करता आली त्याबद्दल लायन्स क्लबचे अध्यक्ष परेशजी उदावंत, सेक्रेटरी बाळासाहेबजी जोरी, खजिनदार अंकुशजी जोशी, लिओ क्लबचे अध्यक्ष सुमितजी सिनगर, सेक्रेटरी धीरजजी कराचीवाला, खजिनदार यशजी बंब, प्रोजेक्ट चेअरमन ओंकारजी भट्टड, अनिकेतजी भडकवाडे व सर्व सदस्यांचेही मनःपुर्वक आभार.यापुढेही ज्यावेळी असे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील त्यावेळी कोपरगावकर त्यात आपले योगदान नक्कीच देतील असा मला विश्वास आहे व मी स्वतः अशा उपक्रमांसाठी नेहमीच हवी ती मदत करण्यास तयार आहे अशी ग्वाही देतो.असे याप्रसंगी अनिरुध्द काळे म्हणाले आहे.



