ब्रेकिंग
समाजाला दिशा देवुन पिढी घडविणारे शिक्षक आदर्शवत – बनकर
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवाडी मंजुरचे शिक्षक किरण वाल्मीक निंबाळकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने दिलीप बनकर व त्यांच्या सहका-यांनी सत्कार केला.
समाजाला दिशा देवुन पिढी घडविणारे शिक्षक आदर्शवत – बनकर
कोपरगांव :- समाजाला दिशा देवुन पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करतात त्यांना शासनाच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त होतात असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा वृध्द कलावंत मानधन समितीचे माजी अध्यक्ष दिलीप बनकर यांनी केले. तालुक्यातील कारवाडी मंजुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक किरण वाल्मीक निबांळकर यांना यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुह व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयूटच्यावतीने सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. श्री. दिलीप बनकर पुढे म्हणाले की, ग्रामिण भागातील मुला मुलींना शिक्षणाच्या दर्जेदार संधी निर्माण करून देण्यांत तालुक्याचे माजी सभापती व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचा सिहांचा वाटा आहे. त्यांच्या सभापतीच्या कार्यकाळात त्यांनी शाळा, खोल्या आणि प्राथमिक शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत हरहुन्नरी शिक्षकांना प्रोत्साहन दिले. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी १९८२ मध्ये संजीवनी एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्या माध्यमांतुन शेतक-यांच्या मुला मुलींना येथेच मुंबई पुणे धर्तीवरील अभियांत्रीकी व तंत्रनिकेतन शिक्षणाबरोबरच व्यवस्थापन अभ्यासक्रम बालवाडी पासुन ते पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्यांने तालुक्याचा शैक्षणिक स्तर वाढला आहे. प्राथमिक शिक्षक किरण निंबाळकर हे अनुभवी आणि शिक्षकी व्रताला प्रामाणिक राहून ग्रामिण भागातील मुला मुलींचा बुध्दांक वाढविण्यांसाठी अहोरात्र कष्ट घेतात त्यामुळेच त्यांना शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. याप्रसंगी सर्वश्री. हरिष कोकाटे, दत्तात्रय भोसले, प्रशांत वाबळे, मुख्याध्यापक सुभाष पायमोडे, मंडलिक सर आदि उपस्थित होते.
u


