नवरात्रीनिमित्त यंदा राजगिरा लाडू ला सगळ्यात जास्त मागणी- उत्पादक रोहित काले
नवरात्रीनिमित्त यंदा राजगिरा लाडू ला सगळ्यात जास्त मागणी- उत्पादक रोहित काले
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव : मागील २ वर्षे कोरोना मध्ये गेले असल्यामुळे सर्व सण हे ठराविक प्रमाणात करण्यात आले होते पण यंदाच्या वर्षी गणेश उत्सवानंतर नवरात्री उत्सव हा जल्लोषात साजरा करण्यात आला. आणि यंदाही महिला भगिनींनी उपवासाचा लाभ घेतला. उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांपैकी राजगिरा लाडू हा सर्वांच्या पसंतीस पडला आहे. तसेच भगर,साबुदाणा,खजूर आणि बटाट्या चा चिवडा सोबत सर्वात जास्त मागणी ही गुळ युक्त राजगिरा लाडू,चिक्की,शेंगदाणा चिक्की यांना मिळत आहे.
यावेळी कालांश राजगिरा लाडू चे उत्पादक रोहित काले यांनी गुळयुक्त राजगिरा लाडू आणि चिक्की ची विक्री मागील दोन वर्षांपेक्षा या वर्षी तीन पटीने वाढ झाली आहे. लाडू बनवण्याची प्रक्रिया मानवनिर्मित असल्याने जास्तीत जास्त महिलांना रोजगार मिळाला तसेच महागाईच्या काळात आजही राजगिरा लाडू सर्व सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत मिळत आहे तसेच राजगिरा लाडू हा शरीरासाठी अनेक फायदे असल्यामुळे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत याचा आस्वाद घेत आहे,त्यामुळे यंदा ग्राहकांची पसंती गुळयुक्त राजगिरा लाडू ला मिळत आहे.



